टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार महिला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:07 AM2021-01-24T04:07:09+5:302021-01-24T04:07:09+5:30

तळेगाव दशासर : रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. औरंगाबाद- ...

Two-wheeler woman seriously injured in tanker collision | टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार महिला गंभीर

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार महिला गंभीर

Next

तळेगाव दशासर : रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. औरंगाबाद- नागपूर सुपर हायवेवरील स्थानिक एका धाब्याजवळ शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात टँकरदेखील उलटला.

अमिता व एकनाथ हरगे (रा. वर्धा) हे दाम्पत्य एमएच ३२ एपी १११० क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना एम एच ४० बी एल ०४८१ क्रमांकाच्या टँकरने त्यांना धडक दिली. यात अमिता हरगे (३५) या गंभीर जखमी झाल्या. त्यांचे पती किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार पाटील, बिरणजे हे घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त महिलेला रुग्णवाहिकेतून वर्धा येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले. टँकर उलटल्यानंतर चालक पसार झाला. अपघातामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

Web Title: Two-wheeler woman seriously injured in tanker collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.