शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीचोरी, घरफोडी करणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 05:00 IST

शुभम ऊर्फ चिपलीन बंडू धाकडे (१९, रा. जुनी वस्ती, कांडली, परतवाडा), आनंद विकासराच डायलकर  (२१, बोरगाव दोरी, ता. अचलपूर), शुभम गोपाळराव वैराळे (२४, रा. राजनापूर्णा, ता. चांदुरबाजार) व रितीक चंदू इंगळे (२०, रा. भालसी ता. भातकुली) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकीचोरी, घरफोडी करणाऱ्या चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्यांनी घरफोडीच्या तीन घटनांची कबुली दिली. शुभम ऊर्फ चिपलीन बंडू धाकडे (१९, रा. जुनी वस्ती, कांडली, परतवाडा), आनंद विकासराच डायलकर  (२१, बोरगाव दोरी, ता. अचलपूर), शुभम गोपाळराव वैराळे (२४, रा. राजनापूर्णा, ता. चांदुरबाजार) व रितीक चंदू इंगळे (२०, रा. भालसी ता. भातकुली) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.  सहायक पोलीस निरीक्षक  रामेश्वर थोडगे व त्यांचे पथकातील अंमलदार हे ५ एप्रिल रोजी अचलपूर उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की, एका इसमाजवळ चोरीची गाडी असून तो लाखनवाडी येथे विक्री करण्याकरिता लोकांना विचारपूस करीत आहे. त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने स्वत:चे नाव  शुभम ऊर्फ चिपलीन बंडू धाकडे असे सांगितले.  त्याच्यासह त्याच्या तीन साथीदारांकडून एकूण आठ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. याशिवाय परतवाडा व आसेगाव व कळमेश्वर येथे नोंद असलेल्या गुन्ह्यातील  २ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या  मोटारसायकली आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरल्या. रितिक इंगळे रा. भालसी याने शुल्लक किमतीने त्या खरेदी केल्या होत्या व त्या विक्री करण्याकरिता ग्राहकांचा शोध घेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार मूलचंद भांबूरकर, हवालदार दीपक उईके, युवराज मानमोठे,  मंगेश लकडे,  स्वप्निल तंवर, नितीन कळमकर यांनी कारवाई केली.

 

टॅग्स :Thiefचोर