शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जयस्तंभ चौकातील दोन मोबाईल शॉपी फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 05:00 IST

योगेश रत्नानी (४५, रा. व्यंकटेश कॉलनी) यांचे आरके टेलिकॉम व शेजारच्या बकुल एंटरप्रायजेस या दुकानातून अनुक्रमे ८.१५ लाख व १२ लाखांचे मोबाईल व अन्य साहित्य लंपास करण्यात आले. या दुकानांचे शटर मधून फोडण्यात आले. एकाच टोळीने चोरी केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. ठाणेदार नीलिमा आरज यांनी पंचनामा केला. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलीस उपायुक्त विक्रम साळी व सहायक आयुक्त भारत गायकवाड यांनीदेखील पाहणी केली.

अमरावती : स्थानिक जयस्तंभ चौकातील दोन मोबाईल विक्रीची दुकाने फोडून तब्बल २० ते २१ लाख रुपयांचे मोबाईल संच लंपास करण्यात आले. चोरांनी महागड्या हेडफोन व ब्ल्यूटूथवरदेखील डल्ला मारला. शहर कोतवालीच्या हद्दीत गुरुवारी पहाटे ५ ते ६ च्या सुमारास ही घटना घडली. एका दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चोरांचे चेहरे कैद झाले आहेत. योगेश रत्नानी (४५, रा. व्यंकटेश कॉलनी) यांचे आरके टेलिकॉम व शेजारच्या बकुल एंटरप्रायजेस या दुकानातून अनुक्रमे ८.१५ लाख व १२ लाखांचे मोबाईल व अन्य साहित्य लंपास करण्यात आले. या दुकानांचे शटर मधून फोडण्यात आले. एकाच टोळीने चोरी केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. ठाणेदार नीलिमा आरज यांनी पंचनामा केला. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलीस उपायुक्त विक्रम साळी व सहायक आयुक्त भारत गायकवाड यांनीदेखील पाहणी केली. योगेश रत्नानी यांना गुरुवारी सकाळी ही चोरी निदर्शनास आली. त्यांच्या दुकानातील ८.१५ लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरीला गेले. पोलिसांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त केला. विशेष म्हणजे, चोरांनी त्यांच्या दुकानातील दोन ते तीन लाखांच्या मोबाईलला हात लावला नाही. दोन दुकाने सोडून असलेल्या बकुल एंटरप्रायजेसमधून १२ लाखांचे ३४ मोबाईल, १२ हजारांचे तीन हेडफोन लंपास करण्यात आले. मात्र, तेथील सीसीटीव्ही रात्री बंद होता. त्यामुळे चोर टिपले गेले नाहीत. सन २०११ मध्ये देखील बकुल एंटरप्रायजेस फोडण्यात आले होते. 

दोन्ही घटनांमध्ये साम्य आहे. चोरांच्या एकाच टोळीने चोरी केली असावी, असा प्राथमिक कयास आहे. सीसीटीव्हीमध्ये चोर कैद झाले आहेत. श्वानपथकाने पेट्रोल पंपापर्यंत त्यांचा माग काढला. सभोवतालसह अन्य ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले जात आहेत. पथके गठित करण्यात आली आहेत. - भारत गायकवाडसहायक पोलीस आयुक्त

 

टॅग्स :Thiefचोर