शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नाकाबंदीदरम्यान दोन लाखांची रोख जप्त

By admin | Updated: November 16, 2016 00:16 IST

नाकाबंदीदरम्यान राजापेठ पोलिसांनी गोपालनगर टी-पॉर्इंटवर एका कारमधून दोन लाखांची रोख सोमवारी रात्री जप्त केली.

गोपालनगर टी-पॉर्इंटवरील घटना : राजापेठ पोलिसांची कारवाईअमरावती : नाकाबंदीदरम्यान राजापेठ पोलिसांनी गोपालनगर टी-पॉर्इंटवर एका कारमधून दोन लाखांची रोख सोमवारी रात्री जप्त केली. ती रोख नागपूर येथे रूग्णालयीन कामाकरिता नेत असल्याचे संबंधित कारचालकाने सांगितले आहे. मात्र, पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे पोलिसांनी ती रोख जप्त केली आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत दररोज रात्री नाकाबंदी केली जात आहे. यामार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करून नियमबाह्य वाहनांवर कारवाई केली जात आहे. सोमवारी रात्री राजापेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिशीर मानकर यांच्या नेतृत्वात गोपालनगर टी-पॉइंटवर नाकाबंदी सुरू होती. दरम्यान नागपूरवरून अकोला मार्गाकडे जाणाऱ्या एका कारची पोलिसांंनी तपासणी केली. त्याकारमध्ये दोन लाखांची रोख रक्कम आढळून आली. ती कार किशनचंद गगनानी (रा.भीमचौक, आहुजानगर, नागपूर) यांची होती. पोलिसांनी कार मालकाची चौकशी केली असता ती रोख नागपूरवरून अमरावती जात असल्याची माहिती मिळाली. अकोला जिल्ह्यातील कराड येथील रूग्णालयात नातेवाईक दाखल असून त्यांच्या उपचाराकरिता ती रोख नेत असल्याची माहिती कारमालकाने पोलिसांनी दिली. मात्र, पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे पोलिसांनी ती रोख जप्त केली. मंगळवारी संबंधित प्रकरणाचे दस्तऐवज पोलिसांनी न्यायालयात सादर केले असून कार मालकानेही पैसे मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. (प्रतिनिधी)नाकाबंदीदरम्यान कारमध्ये दोन लाखांची रोख आढळून आली. रुग्णालयीन कामकाजाकरिता ती रोख नागपूर येथे नेत असल्याचे कार मालकाने सांगितले. मात्र, पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्याने ती रोख जप्त करावी लागली. न्यायालयीन आदेशानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येईल. - शिशीर मानकर, पोलीस निरीक्षक, राजापेठ पोलीस ठाणे.