शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
Top Marathi News Live: इराणने अमेरिकेला पाठवला नवा प्रस्ताव, पाकिस्तान मध्यस्थ
3
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
4
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
5
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
6
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
7
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
8
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
9
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
10
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
11
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
12
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
13
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
14
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
15
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
16
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
17
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
18
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
19
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
20
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
Daily Top 2Weekly Top 5

निरीक्षणगृहातून दोन मुलींचे पलायन

By admin | Updated: August 3, 2014 23:03 IST

गाडगेनगर परिसरातील निरीक्षण गृहातील केअर टेकरच्या हातावर तुरी देऊन पलायन करणाऱ्या दोन मुलींना शनिवारी उशिरा रात्री बडनेरा व जुना बियाणी चौकातूून ताब्यात घेण्यात आले.

गाडगेनगरातील घटना : उशिरा रात्री मुलींना घेतले ताब्यातअमरावती : गाडगेनगर परिसरातील निरीक्षण गृहातील केअर टेकरच्या हातावर तुरी देऊन पलायन करणाऱ्या दोन मुलींना शनिवारी उशिरा रात्री बडनेरा व जुना बियाणी चौकातूून ताब्यात घेण्यात आले.गाडगेनगर परिसरातील शासकीय मुलींच्या निरीक्षणगृह, बालगृहात शनिवारी रात्री ८.३० वाजता ही घटना घडली. पोलिसांना माहिती मिळताच तपासाची सूत्रे हलवून फ्रेजरपुरा व बडनेरा रेल्वे पोलिसांनी मुलींना पकडून निरीक्षणगृहाच्या ताब्यात दिले.चंद्रपूर येथील रहिवासी दीपा (१७ बदललेले नाव) वर प्रियकराची हत्या केल्याचा आरोप आहे. तर नागपूर येथील रहिवासी स्नेहल (१७ बदललेले नाव) हिने बालवयात विवाह केल्याचा आरोेप आहे. त्यांना शासकीय मुलीच्या निरीक्षण बालगृहात ठेवण्यात आले होते. नियंत्रण कक्षाची कामगिरीशनिवारी रात्री ८.३० वाजाता निरीक्षण गृहातील मुलींनी जेवण केले.तेथील मुली आतमध्ये फेरफटका मारीत होत्या. दरम्यान निरीक्षण गृहाच्या चॅनल गेटला कुलूप नसल्याची बाब दीपा व स्नेहलच्या निदर्शनास आली. त्यांनी संधीचा फायदा घेत केअर टेकर महिलेच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. मुली पळून गेल्याची माहिती केअर टेकरला मिळताच त्यांनी पोलिसांना कळवले. रात्री उशिरा पोलिसांनी पळून गेलेल्या दोन्ही मुलींना पकडून निरीक्षकाच्या ताब्यात दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.निरीक्षण गृहातून दोन मुली पळाल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती. ही माहिती नियंत्रण कक्षाकडून सर्व पोलीस ठाण्याला देण्यात आली. स्नेहल ही जुना बियाणी चौकात दोन मुलांना पळून जाण्यासाठी मदत मागत होती. दरम्यान त्यातील एका मुलाने याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. कर्तव्यावर असणारे उपनिरीक्षण बळीराम राठोड व गजानन डोईफोडे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फ्रेजरपुरा पोलीस व चार्ली कमांडोंना माहिती दिली.रात्री त्यांनी स्नेहलला ताब्यात घेतले. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात याची नोंद घेऊन निरीक्षणगृहात सोडले.