प्राणघातक हल्ल्यातील दोन फरार आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:09 IST2021-07-12T04:09:40+5:302021-07-12T04:09:40+5:30

अमरावती : फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील पिंपळखुटा येथे क्षुल्लक कारणावरून भांडण करून दोघांवार चाकूने प्राणघातक हल्ला चढवून गंभीर जखमी केले ...

Two fugitive accused in the assassination attempt arrested | प्राणघातक हल्ल्यातील दोन फरार आरोपींना अटक

प्राणघातक हल्ल्यातील दोन फरार आरोपींना अटक

अमरावती : फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील पिंपळखुटा येथे क्षुल्लक कारणावरून भांडण करून दोघांवार चाकूने प्राणघातक हल्ला चढवून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणात एका आरोपीला यापूर्वीच पोलिसांनी अटक केली, तर दोन फरार आरोपींना रविवारी फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केले. सदर आरोपी नागपूर येथे पसार झाले होते.

निखील प्रभाकर अर्मट (२७ रा. पिंपळखुटा), चैतन ऊर्फ चिक्या मनोज सूर्यवंशी (२०, रा. विलासनगर) असे अटक करण्यात आलेल्या फरार आरोपींची नावे आहे. यापूर्वी पोलिसांनी गोपी डाखोरे याला अटक केली होती. ९ जुलैला सदर आरोपींनी प्रवीण साहेबराव आडे व विलास आडे यांच्यावर जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी भादविची कलम ३०७, ३४१, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम करीत आहेत.

Web Title: Two fugitive accused in the assassination attempt arrested