भरदिवसा फोडले दोन फ्लॅट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 23:58 IST2017-08-18T23:58:05+5:302017-08-18T23:58:25+5:30

भरदिवसा दुपारी १२ ते १ च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी केवल कॉलनीतील विसावा व सिद्धार्थ अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट फोडून ४० ग्रॅ्रम सोन्याचे दागिने व २५ हजार रुपये रोख लंपास केली.

Two flat flats | भरदिवसा फोडले दोन फ्लॅट

भरदिवसा फोडले दोन फ्लॅट

ठळक मुद्देकेवल कॉलनीतील घटना : विसावा, सिद्धार्थ अपार्टमेन्ट 'लक्ष्य'

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भरदिवसा दुपारी १२ ते १ च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी केवल कॉलनीतील विसावा व सिद्धार्थ अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट फोडून ४० ग्रॅ्रम सोन्याचे दागिने व २५ हजार रुपये रोख लंपास केली. या चोरीमुळे शहरात चोरांचे मनोबल वाढल्याचे चित्र आहे.
केवल कॉलनीस्थित विसावा अपार्टमेंटमधील रहिवासी प्रा.शैलेश जावळकर व त्यांची पत्नी शुक्रवारी सकाळी ड्युटीवर गेले. अज्ञात चोरांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये शिरून कपाटाच्या चावी शोधून २५ हजारांची रोख लंपास केली. तसेच सिध्दार्थ अपार्टमेंटमधील रहिवासी वैशाली खापरे ही महिला एक मुलगा व एका मुलीसोबत तिसºया माळ्यावरील फ्लॅटमध्ये राहते. शुक्रवारी वैशाली खापरे या कृषि विभागात कामानिमीत्त गेल्या होत्या, तर त्यांची दोन्ही मुले हे शाळेत गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलुप तोडून घरातील ४० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. या दोन्ही चोरीच्या घटनांची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी पाचारण करून पंचनामा केला. श्वान व ठसे तज्ज्ञाच्या मदतीने तपास कार्य सुरु करण्यात आले. पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली होती.

Web Title: Two flat flats