बीएसएनएल अधिकाऱ्यांचे दोन दिवसीय धरणे

By Admin | Updated: September 7, 2016 00:18 IST2016-09-07T00:18:57+5:302016-09-07T00:18:57+5:30

बीएसएनएल मधील जेटीओ, एसडीई तसेच इतर तत्सम दर्जाच्या अधिकाऱ्यांचे रखडलेले वेतन त्वरित निर्धारित करण्यात यावे,...

Two-day dam of BSNL officers | बीएसएनएल अधिकाऱ्यांचे दोन दिवसीय धरणे

बीएसएनएल अधिकाऱ्यांचे दोन दिवसीय धरणे

आंदोलन : मागण्या मान्य न झाल्यास २७ पासून उपोषण 
अमरावती : बीएसएनएल मधील जेटीओ, एसडीई तसेच इतर तत्सम दर्जाच्या अधिकाऱ्यांचे रखडलेले वेतन त्वरित निर्धारित करण्यात यावे, बीएसएनएलमध्ये नियुक्ती करण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांना इतर शासकीय अधिकाऱ्यांप्रमाणे निवृत्ती नंतरचे अर्थसहाय्य देण्यात यावे, यासह इतर प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी बीएसएनएल अमरावती जिल्हा शाखेतील सर्व अधिकाऱ्यांनी देशभर सुरु असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून बीएसएनएलच्या कार्यालयासमोर मंगळवारी धरणे दिले.
हे आंदोलन बुधवारीही सुरू राहणार आहे. यासंदर्भात याच संघटनेचे युनाईटेड फोरम आॅफ बीएसएनएल एक्सिक्युटीव्ह असोसिएशन, दिल्ली यांनी केलेल्या आव्हानानुसार २३ आॅगस्टला रोजीही मागण्यांची पूर्तता न झाल्यास येत्या २७ सप्टेंबर पासून तीन दिवसीय उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. वेतन, निवृत्तीवेतन तसेच पदोन्नती हे कुठल्याही कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न असून त्याची हातळणी योग्य तसेच मानवीय दृष्टीकोणातून होणे अगत्याचे असते. परंतु बीएसएनएल मधील अधिकाऱ्यांचे याच संदर्भातील विविध प्र्रश बीएसएनएलच्या आस्थापनाने तसेच केंद्रीय दूरसंचार विभागाने प्रलंबित ठेवल्याचा आरोप जॉर्इंट फोरने केला आहे. आंदोलनात डी.एच.भड, एस. आर. काळमेघ, ए.व्ही. चांगोले, एस. एच. गांधी, एस. डी. वानखडे, ए. आर. घाटोळे, डी.जी. पोके, एम. बी.कराळे, एन. बी. विटालकर, एम.पी. फुरसुळे, मनीष माहुरे, निलेश जिचकार, निलेश वानखडे, जी. वाय. शेरेकर, एम. किरणकुमार, सुहेल अहमेद, एच.एन. बागडे, ओ.जी. सोटे, डी.आर. डीके, व्ही. के. ढोरे,.आरती चुंंगर्डे सहभाग होता.

Web Title: Two-day dam of BSNL officers