शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शी येथे स्पार्किंगमुळे दोन मुले भाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:14 IST

मोर्शी : शहरातून हिवरखेड येथे गेलेल्या विद्युत वाहिनीच्या तारांचे स्पार्किंग होऊन दोन मुले गंभीररीत्या जखमी झाली. प्रभाग क्रमांक ८ ...

मोर्शी : शहरातून हिवरखेड येथे गेलेल्या विद्युत वाहिनीच्या तारांचे स्पार्किंग होऊन दोन मुले गंभीररीत्या जखमी झाली. प्रभाग क्रमांक ८ मधील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. अर्पित रमेश खुरपे (९) व पार्थ टिकाराम खुरपे (८) अशी भाजलेल्या मुलांची नावे आहेत.

मोर्शी पॉवर हाऊस येथून जुनी पाण्याची टाकी मार्गे हिवरखेड येथे ३३ केव्हीची मुख्य वीज वाहिनी गेली आहे. टाकीच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या खुरपे कुटुंबातील अर्पित व पार्थ हे दोघे भाऊ घराच्या स्लॅबवर खेळत होते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तारेचे घर्षण होऊन त्याचा जबर झटका या दोन्ही मुलांना बसला. धोका ओळखून पार्थने मोठ्या भावाला खाली ढकलून दिले. विजेच्या धक्क्याने अर्पितचे डोके व चेहरा, तर पार्थचे हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. लगेच नागरिकांनी त्यांना मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, उपजिल्हा रुग्णालयात कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

परिसरात वारंवार अशा घटना घडत असून, महावितरणने त्याकडे दुर्लक्ष चालविले आहे. या गंभीर समस्येची नोंद घेऊन महावितरणने या वीजतारा इतरत्र वळवाव्या, अन्यथा नागरिकांना घेऊन उपोषणास बसण्याचा इशारा या प्रभागाचे नगरसेवक तथा पालिका उपाध्यक्ष आप्पा गेडाम यांनी दिला आहे.