शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर-परतवाडा सुंदर बनविण्यासाठी प्रयत्नशील

By admin | Updated: May 10, 2015 00:33 IST

जिल्ह्यात जुळे शहर म्हणून ओळख असलेल्या अचलपूर-परतवाडा परिसरात विविध समस्या उद्भवत आहे.

फिनले मिलची पालकमंत्र्यांनी केली पाहणी : बैठकीत समस्यांवर चर्चाअमरावती : जिल्ह्यात जुळे शहर म्हणून ओळख असलेल्या अचलपूर-परतवाडा परिसरात विविध समस्या उद्भवत आहे. यावर लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या समन्वयाने मार्ग काढण्यात येईल. शहर सुंदर बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील असून विविध समस्यांवर एकत्रितपणे उपाय योजले जातील. शहरातील अतिक्रमण हटविण्याला विशेष प्राधान्य असून अतिक्रमितांची गय केली जाणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी यावेळी केले. अचलपूर नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी आमदार रमेश बुंदिले, अचलपूर नगर परिषदेचे अध्यक्ष रंगलाल नंदवंशी, उपाध्यक्ष मोहम्मद गनी, उपविभागीय अधिकारी षन्मुग राजन, तहसीलदार लोणारकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जावळीकर उपस्थित होते.अचलपूर शहराचा विकास करताना लोकप्रतिनिधींनी हेवेदावे बाजूला ठेवून एकजुटीने काम करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. आढावा बैठकीत अचलपूरची पाणीपुरवठा योजना, घरकूल योजना, परेड ग्राउंड, रस्त्यावरील अतिक्रमणे, नगरपरिषद शाळांची स्थिती, पॉलिटेक्निक कॉलेज, आठवडी बाजाराची जागा, बिच्छन नदी सुशोभीकरण, झोपडपट्टी विकास, डंपिंग ग्राउंड, अंतर्गत गटार व्यवस्था आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अचलपूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने पालकमंत्र्यांसमोर नगरसेवकांनी तसेच पत्रकारांनी विविध विषयांशी संबंधित समस्या मांडल्या. शहराच्या समस्या सोडविताना विविध विभागांनी त्यांच्याशी संबंधित विषयांचा पाठपुरावा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधितांना दिले. फिनले मिलला भेट देऊन पालकमंत्र्यांनी व्यवस्थापन व कामगारांशी चर्चा केली. फिनले मिलचे जनरल मॅनेजर ए. सुकुमार यांनी पालकमंत्र्यांना फिनले मिलबद्दल माहिती दिली. फिनले मिल परिसरात उप उत्पादने तयार करुन जास्तीत जास्त बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी रेल्वेकडून मिलला मिळालेल्या जमिनीची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. मिलमधील कामगारांचे प्रश्न व्यवस्थापनाने सहानुभूतीपूर्वक सोडवावे, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. त्याआधी पालकमंत्र्यांनी अचलपूर सहकारी औद्योगिक वसाहतीला भेट देऊन उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या. या वसाहतीत रस्ते, स्ट्रीट लाईट व वीजेची समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष हरिकिशन अग्रवाल, नगरसेवक अभय माथने, रुपेश ढेपे, महसूल, बांधकाम विभागातील अधिकारी, नगरसेवक व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)