शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:11 IST

नांदगाव पेठ : राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले. या अपघातात एक जण जागीच ठार, तर त्याचा ...

नांदगाव पेठ : राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले. या अपघातात एक जण जागीच ठार, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास रहाटगाव येथील चारचाकी वाहनाच्या शोरूमसमोर घडली.

रुग्णालयातून घरी परतताना दोन मित्रांवर काळाने घाला घातला. मनोज राजाभाऊ ढबाळे, असे मृत तरुणाचे, तर ऋषिकेश दादाराव घाटोळ, असे जखमीचे नाव आहे. दोघेही तिवसा तालुक्यातील वाठोडा खुर्द येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. मनोज आणि ऋषीकेश हे दोघेही सोमवारी सकाळी एमएच २७ एस ९८५७ या दुचाकीने अमरावती येथील खासगी रुग्णालयात आले होते. रुग्णालयाचे काम झाल्यानंतर ते वाठोडा खुर्द येथे परत जात असताना दुपारी ३ वाजताच्या सुमारास रहाटगाव येथील एका कार शोरूमजवळ ओ.डी.१५ एन ७९५५ या १८ चाकी मालवाहू ट्रकने दुचाकीस धडक दिली. दुचाकीसह मनोज ट्रकच्या मागील चाकात आल्याने त्याचा चेहरा चेंदामेंदा झाला. तो जागीच ठार झाला. मागे बसलेला ऋषिकेश गंभीररीत्या जखमी झाला. घटना घडताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. नांदगाव पेठचे ठाणेदार अनिल कुरळकर यांचेसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. जखमी ऋषीकेशला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच मनोजच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. नांदगाव पेठ पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.