शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थी महसूल आयुक्त कार्यालयावर धडकले

By admin | Updated: October 11, 2016 00:20 IST

आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश क्षमता वाढविण्याच्या मागणीसाठी शेकडो आदिवासी ...

शासनावर ताशेरे : वसतिगृह प्रवेश क्षमता वाढीचा प्रश्नअमरावती : आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश क्षमता वाढविण्याच्या मागणीसाठी शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी सोमवारी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयावर धडक दिली. महिन्याभरात या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेतला नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांनी यावेळी शासनावर ताशेरे ओढले.आदिवासी आजी, माजी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह विद्यार्थी समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चात प्रवेशापासून वंचित असलेले विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळा- महाविद्यालय सुरू होऊन तीन महिने उलटले आहे. तरीदेखील आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे गरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांनी कुठे राहावे, असा सवाल निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. शासन राबवीत असलेल्या चुकीच्या धोरणामुळे अमरावती येथील १६५१ आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात प्रवेशापासून वंचित असल्याचा आरोप करण्यात आला. २८ सप्टेंबर रोजी अपर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. खा. आनंदराव अडसूळ, आ. बच्चू कडू यांच्या समक्ष अपर आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेतून वसतिगृहात वाढीव क्षमतेच्या प्रवेशासंदर्भात ४ आॅक्टोबर रोजी कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल, या आश्वासनानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले. दरम्यान ५ आॅक्टोबर रोजी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त राजीव जाधव हे दौऱ्यावर आले असताना त्यांच्या पुढ्यात ही समस्या ठेवण्यात आली. त्यांनीदेखील ७ आॅक्टोबर रोजी वसतिगृहात वाढीव क्षमतेचा प्रस्ताव मान्य होईल, अशी ठोस ग्वाही दिली होती. परंतु १० आॅक्टोबर उजाळले तरीसुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या प्रवेशाचा तिढा कायम सुटण्याचे नावच घेत नसल्याचे दिसत असल्याने आता महसूल आयुक्तांनी लक्ष घालून वसतिगृहात प्रवेशाचा प्रश्न सोडवावा, अशी आर्त हाक आदिवासी विद्यार्थ्यांनी दिली आहे. यावेळी अनिल सुरत्ने, आकाश मडघणे, गजानन पांडे, राजू काळे, प्रवीण पोतरे, सुरेश मुकाळे, संतोष वायले, प्रशांत इंगळे, विश्वनाथ उईके, अमित आडे, सोनेश परचाके, राजेश जावरकर आदी मुले, मुली मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)