शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांना तीन वर्षांचे आयएएस, आयपीएसचे प्रशिक्षण

By admin | Updated: August 10, 2015 00:00 IST

आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी शासन कटिबद्ध असून आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येऊन देश आणि समाजाची सेवा करावी, ...

पालकमंत्र्यांची घोषणा : जागतिक आदिवासी अस्मिता दिन उत्साहातअमरावती : आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी शासन कटिबद्ध असून आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येऊन देश आणि समाजाची सेवा करावी, यासाठी आता शासनाकडून त्यांना तीन महिन्यांचे नव्हे तर तीन वर्षांचे आयएएस, आयपीएस, स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम व खनिकर्म उद्योगमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी येथे केली.येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात रविवारी अपर आयुक्त आदिवासी विकास विभागाच्यावतीने आयोजित जागतिक आदिवासी अस्मिता दिनाच्या अध्यक्षस्थानाहून मार्गदर्शन करताना पालकमंत्री बोलत होते. खासदार आंनदराव अडसूळ यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार राजू तोडसाम, माजी महापौर वंदना कंगाले, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त अशोक आत्राम, सहायक आयुक्त लेखापरीक्षक किशोर गुल्हाने, विठ्ठल मरापे, संजय मडावी, रामेश्वर युवानाते, हेमराज राऊत, सुरेश पटेल, दादाराव सलामे, रमेश धुर्वे, महादेव राघोर्ते आदी व्यासपीठावर उपस्थित होते.पालकमंत्री पुढे म्हणाले, मागील आठ महिन्यांच्या कालावधीत शासनाने आदिवासी समाजासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतलेत. या निर्णयाची अंमलबजावणी आणि खऱ्या गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी मनापासून प्रयत्न करावेत. हा समाज संस्कृती, रुढी, परंपरा जोपासणारा आहे. त्यांच्या संस्कृती संवर्धनासाठीसुध्दा सर्वांनी पुढाकार घ्यावा. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे काळाची गरज ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिका आणि शिकवा हा मूलमंत्र ध्यानी ठेवून समाजाचे ऋण फेडण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. आदिवासी विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षेव्दारे उच्च पदावर आरुढ व्हावा, यासाठी शासनाच्यावतीने प्रशिक्षण योजना आहे. प्रशिक्षणाचा कालावधी तीन वर्षांचा करण्यासाठी शासन स्तरावर निश्चित प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री पोटे यांनी दिली.या कार्यक्रमानिमित्त अमरावती, लातूर व औरंगाबाद या विभागातील इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत गुणवत्ताप्राप्त प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, धनादेश देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्ती खेडाळू अनिल तोडकर यांनाही गौरविण्यात आले. मेळघाटातील अपघातग्रस्त कुटुंबातील मातृछत्र हरविलेल्या तीन मुलांचे पालकत्व स्वीकारल्याबद्दल ज्योती तोटेवार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी यशवंत मानव विकास संस्थेव्दारे निर्मित ‘मी बिरसा मुंडा बोलतोय’ ही एकांकिका सादर करण्यात आली. संचालन गाढवे व ज्योती तोडकर यांनी केले.बहुतांश लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठआदिवासी विकास विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला निमंत्रितांची लांबलचक नावे असलेली कार्यक्रम पत्रिका छापण्यात आली. मात्र पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ व आ. राजू तोडसाम वगळता एकाही लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमात हजेरी लावली नाही. यात गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, महापौर चरणजित कौर नंदा, जिल्हा परिषदचे अध्यक्ष सतीश उईके, माजी मंत्री मधुकर पिचड, वसंत पुरके, शिवाजीराव मोघे, खासदार रामदास तडस यांच्यासह श्रीकांत देशपांडे, सुनील देशमुख, वीरेंद्र जगताप, बच्चू कडू, अनिल बोंडे, यशोमती ठाकूर, रवी राणा, प्रभुदास भिलावेकर, रमेश बुंदिले,अशोक उईके, संतोष टारफे यांचा समावेश आहे.