शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून ग्रामीण भागात धावणार ६१ बसगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:01 IST

जिल्ह्यातील परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार या आगारांतून नजीकच्या तालुक्यांमध्ये व गावांमध्ये सदर बस धावतील. ६१ बसद्वारे दिवसभरात ५४७ बसफेऱ्यांच्या नियोजन करण्यात आले आहे. एकूण १९,२९७ किमीचा प्रवास त्या करतील. त्यामध्ये ११२ चालक व तेवढेच वाहक तैनात करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देदोन महिन्यांपासून प्रवासी वाहतूक बंद : गरीब प्रवाशांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॉकडाऊनमुळे जीवनवाहिनी एसटी बसची चाके थांबली होती. दोन महिन्यांत कोट्यवधीच्या उत्पन्नावर राज्य परिवहन महामंडळाला पाणी सोडावे लागले. मात्र, बडनेरा व अमरावती वगळता ग्रामीण भागातील इतर सहा आगारांतून शुक्रवारी सकाळपासून ६१ बस धावणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली. यासंबंधी परिपत्रकही त्यांनी सर्व आगार व्यवस्थापकांना जारी केले आहे.जिल्ह्यातील परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार या आगारांतून नजीकच्या तालुक्यांमध्ये व गावांमध्ये सदर बस धावतील. ६१ बसद्वारे दिवसभरात ५४७ बसफेऱ्यांच्या नियोजन करण्यात आले आहे. एकूण १९,२९७ किमीचा प्रवास त्या करतील. त्यामध्ये ११२ चालक व तेवढेच वाहक तैनात करण्यात आले आहेत. बसफेऱ्या सुरू होणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनीसुद्धा सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दोन महिन्यानंतर अधिकृत प्रवासी साधने उपलब्ध झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी आसन क्षमतेच्या निम्म्या प्रवाशांना प्रवास करावा लागणार असल्याचे विभाग नियंत्रकांनी स्पष्ट केले.शहरातून बस बंदअमरावती व बडनेरा परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले. महापालिकेचा हा परिसर रेड झोन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे तूर्तास दोन्ही आगार व शहरातून एसटी बस वाहतूक बंद राहणार आहे.

टॅग्स :state transportएसटी