शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

भिलोना शिवारात वाघ; वासराला ओरबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST

घटनास्थळी वाघाने ओरबाडल्यानंतर वाघाच्या नखातून पडलेले वासराच्या अंगावरील केस आढळून आलेत. वाघाच्या पावलाचा ठसादेखील त्या ठिकाणी मिळाले. जमीन कडक असल्यामुळे हा ठसा थोडा अस्पष्ट उटल्याचे सांगण्यात आले. कृषी शाळेचे संचालक अजय उभाड यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनरक्षक उमक व बाळापुरे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले.

ठळक मुद्देगाईने लावले पळवून : सकाळी सव्वाआठ वाजता व्याघ्र दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील भिलोना शिवारात रविवार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वाआठच्या सुमारास व्याघ्र दर्शन झाले. भिलोना येथील शेतकी कृषी विद्यालय परिसरात बांधलेल्या वासराला त्या वाघाने ओरबाडले. दरम्यान गाईने केलेल्या आरडाओरडामुळे तेथे कार्यरत अर्जुन डोंगरदिवे याचे लक्ष त्या वाघाकडे गेले. वाघ बघून अर्जुन डोंगरदिवेची बोलतीच बंद झाली. दरम्यान वासराच्या प्रेमापोटी त्या गाईने दोर तोडून वाघावर हल्ला चढविला. गाईची आक्रमकता बघून त्या वाघाची पळता भूई थोडे, अशी गत झाली होती.घटनास्थळी वाघाने ओरबाडल्यानंतर वाघाच्या नखातून पडलेले वासराच्या अंगावरील केस आढळून आलेत. वाघाच्या पावलाचा ठसादेखील त्या ठिकाणी मिळाले. जमीन कडक असल्यामुळे हा ठसा थोडा अस्पष्ट उटल्याचे सांगण्यात आले. कृषी शाळेचे संचालक अजय उभाड यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनरक्षक उमक व बाळापुरे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. भिलोन्यातील गावकऱ्यांसह हरम आणि लगतच्या पंचक्रोशीत शेकडो गावकरी दाखल झाले. उमक आणि बाळापुरे यांच्या पथकाने त्या वाघाच्या शोधार्थ लगतचा परिसर पिंजून काढला. त्यांना ८०० मीटर अंतरावरील प्रफुल्ल दखने यांच्या मिरचीच्या शेतात वाघाचे पगमार्क स्पष्टपणे आढळून आलेत. हे पगमार्क (ठसे) महिनाभरापूर्वीचे असल्याचे दखने यांनी वनविभागाच्या या पथकाला सांगितले.शेतकरी संतप्तचालू आठवडाभरातील या घटनांबाबत वनविभागाला शेतकऱ्यांकडून माहिती देण्यात आली. परंतु, वनविभागाने याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. उलट या परिसरात वाघ नाही. तुम्ही बघितलेला, तुम्हाला दिसलेला तो वाघ असूच शकत नाही, अशी भूमिका वनविभागाने घेतल्यामुळे प्रत्यक्षदर्शी वनविभागावर चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले जात आहेत.मंगळवारी तिघांना प्रत्यक्ष दर्शनमंगळवार १९ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास अचलपूर-हरम रस्त्यावर तीन युवकांनी प्रत्यक्ष वाघ बघितला. वाघाच्या डरकाळीचेही ते प्रत्यक्षदर्शी ठरलेत. देवरी शिवारात गुरूवार, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान नामदेव कोरडे यांनी वाघाची डरकाळी ऐकल्याचे सांगण्यात येत आहे.वनविभागाची भूमिका संशयास्पदअचलपूर तालुक्यातील पथ्रोट, शिंदी बु., जटांगपूर, पार्डी, वाल्मिकपूर, कामतवाडा, पोही शिवारातही मागील २० दिवसांपासून वाघ फिरत आहे. तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर यात भयभित झाले आहेत. दरम्यान हरम, भिलोना, देवरी, नौबाग शेतशिवाराकडेही वाघाची भटकंती बघायला मिळत आहे. रानडुक्कर, काळवीट, गोऱ्हा याची शिकारही उघडकीस आली. वाघाचे ठसेही आढळले. पण वनविभाग तो वाघ नव्हेच, ती शिकार वाघाची नव्हच या भुमिकेत असून वाघ बघणाऱ्यांना, वाघाची डरकाळी ऐकणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांना खोटे पाडण्यातच धन्यता मानत आहे. प्रत्यक्ष अवलोकन करून साधा दिलासाही या अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेला नाही. परिणामकारक उपाययोजना कार्यान्वित केलेल्या नाहीत. शेतकऱ्यांना दिसणारा वाघ वनविभागाला का दिसत नाही? याविषयीही नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

टॅग्स :Tigerवाघ