शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! अल्पवयीन बहिणीला पळवून नेल्याच्या रागात भावाने भरचौकात केले 'हे अमानुष कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 18:51 IST

Amravati News अल्पवयीन बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून अल्पवयीन भावाने तिच्या प्रियकराला जिवानिशी संपविले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अल्पवयीन बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून अल्पवयीन भावाने तिच्या प्रियकराला जिवानिशी संपविले. गाव शिवारात नेऊन त्याच्यावर चाकूने सपासप वार केले व दुचाकीवर परत गावात आणून भरचौकात फेकून दिले. ही थरारक घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथे गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. अक्षय ऊर्फ गुणवंत दिलीप अमदुरे (२२, रा. चांदूर रेल्वे) असे मृताचे नाव आहे. यात तीन अल्पवयीनांसह एकूण सहा जणांना कुºहा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ( Inhumane act committed by brother in kidnapping of younger sister)प्रेमप्रकरणातून चांदूर रेल्वे तालुक्यातील व कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमला विश्वेश्वर येथील एका अल्पवयीन मुलीला अक्षयने काही दिवसांपूर्वी पळवून नेले होते. दरम्यान पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. मुलीने आम्ही मर्जीने गेलो होतो, असे बयाणात सांगितले होते. मात्र ती अल्पवयीन असल्याने अक्षय अमदुरेविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.अशी घडली घटनाअक्षय अमदुरे हा गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास आमला विश्वेश्वर येथे आला. यात तो ज्या अल्पवयीन मुलीवर कथित प्रेम करत होता, तिच्या भावाला दिसला. आपल्या बहिणीला पळवून नेल्याचा राग त्याच्या मनात होता. आरोपीने दोन मित्रांना सोबत घेऊन अक्षयला दुचाकीने भिवापूर रस्त्यावर नेले. तेथे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चाकूने सपासप वार केले. नंतर त्याला आमला विश्वेश्वर गावात आणून भरचौकात फेकून तेथेसुद्धा जबर मारहाण केली. त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, नागपूरला नेताना रात्री १०.३० च्या सुमारास त्याचा तिवसानजीक मृत्यू झाला.अक्षयला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जास्त रक्तस्त्राव होत असल्याने त्याला नागपुरात उपचारासाठी हलविण्यात आले असता, तिवसाजवळ त्याचा मृत्यू झाला. तीन अल्पवयीनांसह सहा जणांना ताब्यात घेतले. प्रेमप्रकरण व बहिणीला पळवून नेल्याच्या कारणातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.- ईश्वर वर्गे,ठाणेदार, कुऱ्हा पोलीस ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी