शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

गृहिणींनी घेतले चित्तथरारक अनुभव

By admin | Updated: November 13, 2014 22:56 IST

एरवी संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलेल्या गृहिणींना लोकमत सखीमंचच्या पुढाकाराने आयोजित ‘साहस सहली’च्या माध्यमातून जंगल सफारीचा आनंद घेण्याचा योग आला. दोन दिवसांच्या या

‘सखी मंच’ची साहस सहल: रॉक क्लार्इंबिंग, इव्हिनिंग ट्रॅकची धम्मालअमरावती : एरवी संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलेल्या गृहिणींना लोकमत सखीमंचच्या पुढाकाराने आयोजित ‘साहस सहली’च्या माध्यमातून जंगल सफारीचा आनंद घेण्याचा योग आला. दोन दिवसांच्या या सहलीत सखींनी धम्माल आणि थरारक अनुभवांची शिदोरी गोळा केली. अनेक अर्थांनी ही सहल सखींसाठी चिरस्मरणीय ठरली. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील आॅल राऊंडर अ‍ॅडव्हेंचर कॅम्प परिसरात ८ व ९ नोव्हेंबर रोजी महिलांनी इव्हिनिंग ट्रॅक, कॅम्प फायर, लॅडर क्लार्इंबिंग, आर्टिफिशियल वॉल क्लार्इंबिंंग, सनराईज फन एक्सरसाईज, हील ट्रेक, पक्षी निरीक्षण, वर्मा ब्रिज, फन गेम्स, बोटींग, पॅरेशुट रोप वे हुकिंग यांसारख्या चित्तथरारक प्रकारांचा पहिल्यांदाच अनुभव घेतला. सखींनी बोटींगचाही मनमुराद आनंद लुटला. निसर्गाच्या सानिध्यात तंबू ठोकून राहण्याची मौजही या सहलीच्या निमित्ताने सखींना अनुभवता आली. क्षितिजापल्याड दडलेला सूर्य वर येतानाचे विहंगम दृष्य सखींनी डोळ्यांत साठवून घेतले. रात्रीच्या मुक्कामात शेकोटीभोवती फेर धरून विविध खेळांनी सहलीमध्ये रंग भरला.निसर्गाची विविध रूपे अनुभवण्याची संधी या ‘साहस सहली’च्या निमित्ताने महिलांना मिळाली. वयाच्या मर्यादा विसरून महिलांनी या सहलीमध्ये अनेक साहसी प्रकार बिनदिक्कत हाताळले. स्वत:च्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची अनोखी संधी देखील सहलीमुळे आपल्याला मिळाल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया महिलांनी दिली.कधीही बाईकला हात न लावणाऱ्या सखींनी अ‍ॅडव्हेंचर कॅम्पमध्ये मॅन्स्टर बाईक स्वत: भन्नाट चालविली. संसार आणि संसारातील व्यस्त दिनचर्येतूून स्वत:करिता काढलेला वेळ या गृहिणींना आगळा आनंद देऊन गेला. सखीमंचद्वारे आयोजित ही सहल जीवनातील अनुभवांना अधिक समृध्द करणारी ठरली, असे मत सर्वच सखींनी व्यक्त केले. पुढच्या अशाच दमदार सहलीचे नियोजन करीतच सखींनी रामटेकला निरोप दिला. या सहलीकरिता ‘लोकमत’चे जयंत कौलगिकर, सखी मंचच्या स्वाती बडगुजर, शीतल चौहान, अपूर्व डाखोडे यांनी प्रयत्न केले.