शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

हजारांवर विद्यार्थी, सीसीटीव्ही किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:18 IST

श्वानभक्षणाच्या मुद्यावरून गुन्हे दाखल होणे आणि चोरलेले श्वान सोडविण्यासाठी नागरिक विद्यार्थ्यांच्या वसतिगृृहात शिरण्याइतपत स्थिती निर्माण झाली असतानाही.....

ठळक मुद्देपरप्रांतिय विद्यार्थ्यांना अभय कुठवर ?: पशुहत्या रोखण्यासाठी व्यवस्था काय?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : श्वानभक्षणाच्या मुद्यावरून गुन्हे दाखल होणे आणि चोरलेले श्वान सोडविण्यासाठी नागरिक विद्यार्थ्यांच्या वसतिगृृहात शिरण्याइतपत स्थिती निर्माण झाली असतानाही संस्थेच्या प्रांगणात आणि वसतिगृह परिसरात पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे लावून संस्थेने परप्रांतिय विद्यार्थ्यांची नियमबाह्य कृत्ये प्रभावीपणे नियंत्रित का केली नाहीत, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या अखत्यारितील शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या परप्रांतीय विद्यार्थ्यानी पाळीव श्वान चोरले नि कापून खाल्ले. श्रीनाथवाडीतील रहिवाशाच्या तक्रारीनुसार याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यापूर्वी त्याच वस्तीतील नागरिकांनी ब्राऊनी नावाचे एक श्वान चक्क विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या खोलीतून सोडवले होते. हे प्रकार अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू असले तरी या दोन ताज्या घटना त्या परप्रांतिय विद्यार्थ्यांच्या कू्रर प्रवृत्तीची साक्ष पटविणाºया आहेत. श्वानाला 'खंडोबा'चा दर्जा देणाºया त्या परिसरातील मराठी माणसाला या प्रकाराने किती क्लेष होतो, ते त्यांच्या वेदनाकथनांवरून स्पष्ट होतेच.शारीरिक शिक्षण, आयुर्वेद, नॅचरोपॅथी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन, समाजशास्त्र, योगा आदी नानाविध शाखांची रेलचेल असणाºया श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या विस्तीर्ण प्रांगणात किमान हजारांवर विद्यार्थ्यांचा वावर असतो. संस्थेच्या आवारात वसतिगृहेही आहेत.भिंतीलगतच्या श्रीनाथवाडी परिसरातील नागरिकांना त्या परप्रांतिय विद्यार्थ्यांचा त्रास होत असल्याच्या त्यांच्या अनेक दिवसांपासूनच्या तक्रारी आहेत. परप्रांतिय विद्यार्थी शहरातील नागरिकांचे जिणे विपरितरित्या प्रभावित करीत असतील तर संस्थेने अत्यंत संवेदनशीलपणे या मुद्याची दखल घ्यायला हवी. शिस्तीसाठी ओळखल्या जाणाºया या संस्थेतील विद्यार्थ्यांनी शिस्त मोडू नये याकडे कटाक्ष असायला हवा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांची आहे.सुरक्षा भिंंतीवरून कोण विद्यार्थी उड्या मारून श्रीनाथवाडीत शिरतात? कोण वसतिगृहाच्या आवारात श्वानादी प्राणी कापतात, शिजवितात? रात्री किती वाजता ते बाहेर पडतात? महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेला अनुसरून ते वागतात की कसे, या बाबींचे पुरावे सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे सहज उपलब्ध झाले असते. वसतिगृह, महाविद्यालय परिसरात ही व्यवस्था असावी, असे शासनाचेही मत आहे. या व्यवस्थेला तिलांजली का देण्यात आली, हा प्रश्न अनुत्तरित आहे.