तुरीचे कट्टे चोरणारे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:15 IST2021-02-16T04:15:49+5:302021-02-16T04:15:49+5:30

बडनेरा: नवी वस्तीच्या लकडगंज परिसरातून ४० हजार किमतीची दहा कट्टे तूर चोरीस गेली होती त्या आरोपींना पोलिसांनी रविवार मुद्देमालासह ...

Thieves arrested | तुरीचे कट्टे चोरणारे अटकेत

तुरीचे कट्टे चोरणारे अटकेत

बडनेरा: नवी वस्तीच्या लकडगंज परिसरातून ४० हजार किमतीची दहा कट्टे तूर चोरीस गेली होती त्या आरोपींना पोलिसांनी रविवार मुद्देमालासह ताब्यात घेतले.

अभिषेक नरेंद्र सरडे , तुषार रुपराव पवार ,शहेबाज शहा सरदार शहा, एक विधी संघर्ष बालक सर्व राहणार नवी वस्ती बडनेरा असे या घटनेतील आरोपींची नावे आहेत फिर्यादी सचिन गणेश पवार रा. लकडगंज यांच्या घराच्या आवारातून दहा कट्टे तूर चोरीस गेले होते त्याची किंमत ४० हजार असल्याचे नमूद आहे पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी व बबन पुसाटे यांच्या मार्गदर्शनात बडनेरा पोलिसांनी आरोपींना अटक केली आरोपींकडून मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला पोलिसांनी या घटनेत भादवि ३७९कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

Web Title: Thieves arrested