शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

तू ये रे पावसा... कपाशीच्या बुडाशी चक्क अ‍ॅक्वाचं पाणी देतोय बळीराजा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 7:52 PM

शेतकऱ्यांचा आटापिटा : पीक वाचविण्यासाठी धडपड 

अमरावती : एकरी १२ हजार रुपये भाडे देऊन मक्त्याने कसण्यासाठी घेतलेल्या शेतात कपाशीचे पीक जगविण्यासाठी आष्टी येथील दिव्यांग शेतकरी अ‍ॅक्वाचे स्वच्छ पाणी रोपांना देत आहे. गतवर्षी याच शेतात २७ क्विंटल कपाशीचे उत्पादन घेतले; यंदा हे पीक पाणी येईपर्यंत जगले तरी खूप मिळविल्यासारखे होईल, असे हतबल होऊन या शेतकऱ्याने म्हटले. त्याच्या या प्रतिक्रियेतूनच अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील यंदाच्या पाऊसमानाच्या भीषण परिस्थितीचा प्रत्यय येत आहे. 

आष्टी (ता. अमरावती) येथील अल्पभूधारक शेतकरी नीलेश एकनाथराव ढोरे (३३) दिव्यांग आहेत. स्वत:च्या दीड एकर शेतात आई, पत्नी, चार वर्षाचा मुलगा यांची गुजराण शक्य नसल्याने गावालगतची तीन एकर शेती भाड्याने घेऊन तो कसत आहे. यंदा या जमिनीत कपाशीचा पेरा करण्यात आला. भाड्यापोटी एकरकमी ३६ हजार आणि बियाणे, पेरणी व मशागतीचे आठ हजार असे ४४ हजार रुपये आधीच शेत-माऊलीच्या उदरात टाकणाऱ्या नीलेशची पावसाने खोडा टाकताच जमिनीतून वर आलेले पीक जगविण्यासाठी कसरत सुरू झाली आहे. 

अमरावती शहरापासून २६ किमी अंतरावर असलेले आष्टी परिसर हा खारपाणपट्ट्याचा. त्यामुळे सिंचनाची सुविधाच नाही. त्यात जास्त पाणी झाल्यास जमीन चिबड होते. याशिवाय पाण्यात क्षार असल्याने ओलीत केल्यास जमीन क्षारपड होण्याचा धोका आहे. त्यामुळे घरी असलेल्या अ‍ॅक्वा उद्योगात तयार झालेले पाणी शेतात नेऊन पिकांना देण्याची कल्पना नीलेश ढोरे यांनी प्रत्यक्षात आणली. कपाशीला तीन चाकांची सुविधा असलेल्या दुचाकीवर कॅन चढवून त्यांच्यासह पत्नी डिंपल पाणी देत आहेत, तर कधी नातेवाइकाच्या ट्रॅक्टरवर टाकी चढवून पाइपने प्रत्येक रोपाच्या बुडाशी पाणी देण्यात येते. अमरावती जिल्ह्यात सर्वदूर पावसाची प्रतीक्षा होत आहे. ज्यांना शक्य आहे, ते स्प्रिंकलर व इतर मार्गाने सिंचनातून पिके जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, कोरडवाहू शेतकऱ्यांना नशिबाचा हवाला देत स्वस्थ बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. भीषण दुष्काळातच आता दिवसा उन्हाचे चटकेही वाढले आहेत. 

पाऊस ७ जुलैपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. तेव्हापासून रोपांना पाणी देण्याचे काम करीत आहे. पावसाळा पुन्हा सुरू होईपर्यंत या रोपांनी पावसाचा ताण सहन केला तरी दुबार पेरणीचा खर्च टळेल, असे भावनिक उद्गार निलेश यांनी काढले.  - निलेश ढोरे, आष्टी, ता. अमरावती. 

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरीRainपाऊसamravati-acअमरावती