शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही"; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
2
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
3
“आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका
4
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
6
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
7
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
8
'मला कर्करोग आहे, कोणाला सांगायचे नव्हते"; पत्नीला वेदनादायक मृत्यू देऊन पतीने स्वतःला संपवले
9
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
10
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
11
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
12
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
13
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 
14
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
15
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
16
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
17
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
18
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
19
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
20
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...

पोटासाठी वीटभट्टी कामगारांच्या मुलांचे आयुष्य होते उद्ध्वस्त...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:49 IST

Amravati : बालपण हिरावले; शिक्षण, आरोग्याच्या सुविधांपासूनही वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : ज्या वयात अक्षरे गिरवावी, बालपण आनंदात जगावे, नेमके त्याच वयात आदिवासी मुलांच्या नशिबी आलेले चित्र विदारक आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मेळघाटातून स्थलांतरित आदिवासी कुटुंब अमरावती शहरासह लगतच्या वीटभट्ट्यांवर कष्ट करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या सोबत असलेली चिमुकली मुले मात्र त्यांच्या मूलभूत शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या उद्ध्वस्त भविष्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरालगत असलेल्या अंजनगाव बारी, कोडेश्वर येथे जवळपास १५० वीटभट्या आहेत. याठिकाणी काम करणारा मजूर वर्ग हा सर्वाधिक मेळघाटातील आदिवासी बांधव आहे. मेळघाटात रोजगार मिळत नसल्याने पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी शेकडो आदिवासी मजुरांचे हात हे वीट बनवण्यात व्यस्त आहेत. परंतु, या स्थलांतरणामुळे त्यांची चिमुकली मुले आपल्या मूलभूत शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहत आहेत. 

प्रशासनाने सुरू केलेली वीटभट्टीवरील शाळाही बंद असल्याची प्राथमिक माहिती आहे. या वीटभट्टी परिसरात काही स्तनदा माता, तर काही गर्भवती मातादेखील आहेत. त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे. तेथे १ ते ६ वर्षांची मुले ही मातीमध्ये खेळताना, तर थोडी मोठी मुले कामात मदत करताना दिसून येतात. बंद शाळेविषयी प्राथमिक शिक्षणाधिकारी माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अंजनगाव पीएचसीमध्ये तीन महिलांची प्रसूती अंजनगाव बारी पीएचसीने केलेल्या सर्वेक्षणानुसार याठिकाणी १२ स्तनदा माता, तर ६ गर्भवती माता आहेत. ० ते २ वर्षे वयोगटातील ३० बालके, २ ते ६ वर्षे वयोगटातील ७० बालके याठिकाणी आहेत. तीन महिलांची प्रसूतीदेखील आरोग्य केंद्रात आणून करण्यात आली.

पोषण आहारासाठी केली मागणी सर्वेनुसार याठिकाणी ० ते ३ वर्षे वयोची ९० तर ३ ते ६ वर्षांची १८५ बालके आहेत. त्याचबरोबर १६ गरोदर आणि १४ स्तनदा माता आहेत. यासाठी पोषण किट्स मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती