शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वरूडमध्ये वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

तालुक्याला सातपुडा पर्वताची किनार लाभली असून, १० हजार हेक्टरपेक्षा मोठे जंगल आहे. या जंगलात अनेक हिंस्त्र प्राणी आहेत. आता त्यात वाघांचीसुद्धा भर पडली. लिंगा, करवार, कारली, पंढरी, वाई, जामगांव, करवार, एकलविहीर, लोहदरा परिसरात वाघांचा वावर आहे. दिवसागणिक शेतकरी, शेतमजुरांना वाघाचे दर्शन होत आहे. या परिसरतून राष्ट्रीय महामार्ग गेला असल्याने अनेक वाहनचालकांना बिबट्यांचे दर्शन घडले आहे.

ठळक मुद्देतालुक्यात अनेक जनावरांचा फडशा : वनविभागाची शोधमोहिम, ट्रॅप कॅमेरे

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुक्यातील गाडेगाव व बेनोडा जंगलात वाघाची पदचिन्हे आढळल्याने शेतकरी तथा खेडुत दहशतीत आले आहेत. वाघाच्या अस्तिवाला वनविभागाने दुजोरा दिला असून, ज्या भागात वाघ आढळल्याचा दावा करण्यात येत आहे, त्या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.तालुक्याला सातपुडा पर्वताची किनार लाभली असून, १० हजार हेक्टरपेक्षा मोठे जंगल आहे. या जंगलात अनेक हिंस्त्र प्राणी आहेत. आता त्यात वाघांचीसुद्धा भर पडली. लिंगा, करवार, कारली, पंढरी, वाई, जामगांव, करवार, एकलविहीर, लोहदरा परिसरात वाघांचा वावर आहे. दिवसागणिक शेतकरी, शेतमजुरांना वाघाचे दर्शन होत आहे. या परिसरतून राष्ट्रीय महामार्ग गेला असल्याने अनेक वाहनचालकांना बिबट्यांचे दर्शन घडले आहे. यामुळे सदर परिसर हा व्याघ्र प्रकल्प घोषित करावा, अशी मागणी जोर धरत आहे. २३ फेब्रुवारी रोजी बेनोडा परिसरात वाघाचे दर्शन झाल्याने मोर्शी, वरूडच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यानी वाघासाठी संयुक्त शोधमोहीम उघडली आहे.तत्पूर्वी २१ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास गोरेगांव परिसरात वाघाने गोकुल घारड, नरेंद्र घाटोळे या शेतकऱ्यांच्या तीन गार्इंचा फडशा पाडला. तोच वाघ बेनोडा, पळसोना परसिरात आल्याची ओरड सुरू झाली आहे. त्या ठिकाणी वाघाच्या पायांचे ठसे मिळाले आहेत. त्यामुळे संपूर्ण शिवार ओस पडले आहे.पाणवठे आटल्याने नागरी वस्तीकडे धावउन्हाळ्याच्या दिवसांत जंगलातील पाणवठे आटल्याने जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. तहान भागविण्याकरिता हिंस्त्र प्राणी गावाकडे कूच करुन पाळीव जनावरांचा फडशा पाडतात. प्रसंगी मानवावरही हल्ले करण्याच्या घटना ताज्या आहेत. तूर्तास वरुड, महेंद्री जंगलातील पाणवठे आटले आहेत.तालुक्यातील जरूड, बेनोडा, पळसोना, गोरेगाव शिवारात वाघाचा वावर आहे. वरूड व मोर्शी वनविभाग संयुक्तपणे शोधमोहिम राबवित आहेत. युद्धपातळीवर वाघाचा शोध घेतला जात आहे.-प्रशांत लांबाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वरूड

टॅग्स :Tigerवाघ