शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुसला येथे बाजार चिठ्ठी फाडण्यावरुन तणाव

By admin | Updated: January 7, 2016 00:35 IST

स्थानिक आठवडी बाजारात चिठ्ठी फाडण्यावरून उद्भवलेला वाद विकोपाला गेल्याने मंगळवारी मध्यरात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.....

चार जणांविरुध्द गुन्हे दाखल : गल्ला फेकण्यावरून उद्भवला वाद, पोलीस कुमक तैनात पुसला : स्थानिक आठवडी बाजारात चिठ्ठी फाडण्यावरून उद्भवलेला वाद विकोपाला गेल्याने मंगळवारी मध्यरात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांची अतिरिक्त कुमक याठिकाणी तैनात करावी लागली. वरीष्ठ पोलीस अधिकारी येथे रात्रभर तळ ठोकून होते. दरम्यान हजारो नागरिकांनी पोलीस चौकीत जाऊन चिठ्ठी वसूलकर्त्याला अटक करण्याची मागणी केली होती. महिला सरपंचाच्या पतीलासुध्दा वसुली करणाऱ्याने ओढताण केल्याने हा प्रकार घडला. तूर्तास येथे शांतता आहे. येथील आठवडी बाजारात दुकाने लावणाऱ्या दुकानदारांकडून चिठ्ठी वसुलीचे कंत्राट माणिक डोंगरे यांना ग्रामपंचायतीने दिल आहे. यामुळे सदर बाजारचिठ्ठीची वसुली डोंगरे परिवार करते. मंगळवारी आठवडी बाजार असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होती. सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान बाजार चिठ्ठी वसूलकर्ताने एका दुकानदाराला चिठ्ठीचे पैसे मागितले. त्याने चिल्लर नसल्याने १०० रुपयांची नोट दिली. परंतु वसुलीकर्त्याने थेट पैशांच्या गल्ल्यात हात घालून गल्ला फेकला. यावरुन वाद निर्माण झाला आणि तो विकोपाला गेला. थोड्याच वेळेत कंत्राटदार डोंगरे यांचे संपूर्ण कुटुंब घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दुकानदाराला बेदम मारहाण केली. ही घटना ग्रामस्थांना कळताच गावातून शेकडो लोक बाजारात पोहोचले. तेवह सरपंचाचे पती सुनील चिमोटे, उपसरपंच अतुल बगाडे तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही गटांना समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु चर्चा सुरु असतांनाच सरपंच चिमोटे यांना आरोपींनी ओढताण करुन मारहाणीचा प्रयत्न केला. यामुळे वाद आणखीच चिघळला. घटनेची माहिती मिळताच शेंदूरजनाघाटचे ठाणेदार अशोक लांडे यांच्या पोलीस पथकाने पुसला गाठले. वातावरण शांत करण्यासाठी प्रयत्न केला. परंतु परिस्थीती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून वरुड, मोर्शी, बेनोडा तसेच एस.आर.पी जवानांना पाचारण करण्यात आले. हजारो नागरिकांनी पोलीस चौकीसमोर जाऊन चिठ्ठी कंत्राटदाराला अटक करण्याची मागणी केली.घटनेची तीव्रता पाहून अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मकानदार, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गवई, ठाणेदार अशोक लांडे, बेनोडाचे ठाणेदार मुकुंद ठाकरे, अर्जून ठोसरे यांनी रात्रभर तळ ठोकून गावभर गस्त केली. मारहाण झालेल्या दुकानदार प्रफुल्ल गणेश खडगे २ २ रा. पुसला यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनिल रामकिसन डोंगरे (५२), प्रदीप रामकिसन डोंगरे, रोशन राजेंद्र डोंगरे यांच्या विरुध्द भादंविच्या कलम ३२४,५०४,५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. तर सरंपचाचे पती सुनील चिमोटे यांच्या फिर्यादीवरुन जनार्दन डोंगरे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारीला सकाळी १० वाजताचे दरम्यान उपविभागिय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी पुसला येथे भेट देऊन चौकशी केली. तणावाच्या वातावरणामुळे बाजारातील दुकानदारांनी पळ काढल्याने माल जागीच पडून राहिल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले बुधवारी गावात तणावपूर्ण शांतता कायम होती. गावकऱ्यांमध्ये या घटनेबाबत विविध चर्चांना उत आला होता. चिठ्ठी वरून उदभवलेल्या वादामुळे हा प्रकार घडला. आठवडी बाजारातील दुकानदारांची यामुळे मोठी हानी झाली. (वार्ताहर)