शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बँकेच्या मतमोजणीत गैरप्रकार!

By admin | Updated: November 17, 2015 00:18 IST

अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणूक मतमोजणीदरम्यान झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्यात यावी,...

उमेदवारांचा आरोप : पालकमंत्र्यांकडे तक्रारअमरावती : अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणूक मतमोजणीदरम्यान झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बँकेचे नवनियुक्त संचालक किरण पाटील यांच्यासह इतर उमेदवारांनी केला आहे. या संदर्भात पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. ७ नोव्हेंबरला शिक्षक बँकेच्या २१ संचालक निवडीसाठी ९० टक्के मतदान होऊन ८ नोव्हेंबर रोजी मतमोजणी करण्यात आली. सर्वसाधारण मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना मतमोजणी प्रतिनिधी व उमेदवार दोन्हीकडे एकाचवेळी लक्ष ठेवू शकले नाही, असा आरोप किरण पाटील यांच्यासह ज्योती उभाड व इतरांनी घेतला आहे. कैलाश कडू यांना २०९५ मते मिळाल्याचे जाहीर झाल्यानंतर त्यांना विजयी घोषित करण्यात आले नाही. त्यांच्यापेक्षा कमी मते असलेल्या छोटसिंग सोमवंशी आणि सुदाम राठोड यांना विजयी घोषित करण्यात आले. ज्योती उभाड यांच्यासाठी फेरमतमोजणीची मागणी केली असताना निवडणूक निर्णय अधिकारी गौतम वालदे यांनी ती फेटाळली. या पार्श्वभूमीवर कैलास कडू व ज्योती उभाड यांच्यावर निश्चितपणे अन्याय झाला असल्याचा आरोप या शिक्षकांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे. या निवेदनावर चंदन खर्चान, राजेंद्र होले, अरविंद बनसोड, अरविंद महल्ले, सुरेंद्र विघे, उमेश गोदे, किशोर मुंदे अािण कैलास कडू यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.