शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

टोळधाडीच्या नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:01 IST

मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत वरुड तालुक्यातील काही गावांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. पाहणी दौऱ्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, मोर्शीचे उपविभागीय कृषी अधिकारी तसेच क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. टोळधाडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या यंत्रणांनी गावोगावी फिरुन शेतकऱ्यांना उपाययोजना, मार्गदर्शन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश: वरुड, मोर्शी भागात पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यामध्ये टोळधाड या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ही टोळधाड दूरवर उडत जात असल्याने तिच्या मार्गातील वनस्पतीची हिरवी पाने, फुले, फळे, बिया, फांदी, पालवी आदीचा फडशा पाडते. या किडीचा प्रादुभार्वामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. वरूड, मोर्शी व चांदूरबाजार तालुक्यात या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. यावर कृषी विभागाने क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली तात्काळ फवारणी आदी उपाय करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत वरुड तालुक्यातील काही गावांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. पाहणी दौऱ्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, मोर्शीचे उपविभागीय कृषी अधिकारी तसेच क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. टोळधाडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या यंत्रणांनी गावोगावी फिरुन शेतकऱ्यांना उपाययोजना, मार्गदर्शन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. ते पुढे म्हणाले की, टोळधाडीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जिल्ह्यात वरूड, मोर्शी व चांदूरबाजार तालुक्यात टोळधाडीच्या आक्रमणाने शेतकरी चिंतीत झाले आहेत. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी व नागरिकांनी कृषी विभागाकडून जाहीर केलेल्या उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.या उपाययोजना करण्याचे आवाहनवरुड तालुक्यातील पाळा, उमरखेड, गव्हाणकुंड, हिवरखेड या गावांमधून टोळधाडीचा एक थवा स्थलांतरीत होताना कृषी विभागाला आढळून आला आहे. कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणांनी गावोगावी फिरुन शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याचे मार्गदर्शन केले आहे. या अंतर्गत प्रामुख्याने टिनाचे डबे, ढोल वाजविणे, ट्रॅक्टर व मोटरसायकलचे सायलेन्सर काढून शेतात मोठ्याने आवाज करून किडीला हूसकावून लावावे. क्लोरोपायरीफॉस व मेल्यॉथिआॅन या किटकनाशकाची फवारणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.वरूड तालुक्यात पिकांवर फवारणीवरुड तालुक्यातील पुसला, खापरखेडा या शिवारात सायंकाळी या किडीचा थवा थांबलेला आढळल्याने त्यावर ट्रॅक्टर माऊंट स्प्रेअर, अग्निशमन बंबाच्या साहाय्याने कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली फवारणी करण्यात आली. सायंकाळी ६ वाजल्यानंतर टोळधाड उंच झाडांवर स्थिरावते. अशा स्थिरावलेल्या थव्यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना कळवून त्यांच्या देखरेखीखाली सामूहिक फवारणी अग्निशमन बंबाच्या साहाय्याने करावी. ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर माऊंट स्प्रेअर, पॉवर स्प्रेअर, एचटीपी स्प्रेअर फवारणीचे विविध यंत्र उपलब्ध असल्यास त्यांनी फवारणीचे यंत्र सज्ज ठेवून फवारणीसाठी इतरांनाही साहाय्य करावे.

टॅग्स :agricultureशेतीcollectorजिल्हाधिकारी