शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

निराधार योजनेच्या अनुदान मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना

By admin | Updated: May 25, 2015 00:31 IST

संजय गांधी निराधार योजनेच्या तालुकास्तरावरील समित्या अस्तित्वात नसताना निराधार योजनांच्या लाभार्थींचे अनुदान मंजूर ..

समस्या निकाली : समित्या अस्तित्वात नसल्याने होतो खोळंबाजितेंद्र दखने अमरावतीसंजय गांधी निराधार योजनेच्या तालुकास्तरावरील समित्या अस्तित्वात नसताना निराधार योजनांच्या लाभार्थींचे अनुदान मंजूर करण्याचे अधिकार संबंधित तालुक्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. हे अधिकार काढून आता जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदारांना देण्यात आले आहेत.निराधार, वृध्द व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, निराधार विधवा, परित्यक्ता महिला आदी दुर्बल घटकातील व्यक्तिंना विविध योजनांमधून दरमहा अनुदान दिले जाते. पात्र लाभार्थींना अनुदान मंजूर करण्यासाठी शासनाच्यावतीने तालुका पातळीवर समितीची स्थापना करण्यात येते. समितीचे अध्यक्ष व सदस्य हे सत्ताधारी पक्षाचे अधिकारी किंवा कार्यकर्ते असतात. समितीचे सदस्य सचिव म्हणून तहसीलदार काम पाहतात. आलेल्या अर्जांची छाननी करून समितीकडून अनुदान मंजूर केले जाते. अनेकदा ही समिती अस्तित्वात नसताना लाभार्थींचे अर्ज प्रलंबित राहतात. यावर उपाय म्हणून शासनाने २०१० मध्ये लाभार्थींचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले होते. आता हे अधिकार तहसीलदारांच्या सुपूर्द करण्यात आले आहेत. जिल्ह्यासाठी एकच तहसीलदारसमित्या अस्तित्वात नसल्याने सध्या संपूर्ण जिल्ह्यातील लाभार्थींचे अनुदान मंजूर करण्याचे अधिकार संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदारांकडे आले आहेत. त्यामुळे कित्येक वर्षांपासून अडगळीत पडलेल्या या समस्येचा निपटारा झाला आहे.संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान मंजूर करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे होते. हे अधिकार शासनाने संबंधित योजनेच्या तहसीलदारांकडे दिले आहेत. मात्र, तहसीलदारांकडील कामाचा ताण लक्षात घेता पूर्वीप्रमाणे एसडीओ यांच्याकडेच अनुदान मंजुरीचे अधिकार कायम ठेवायला हवे होते. परंतु शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.- सुरेश बगळे, कार्याध्यक्ष, तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना.