शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

रोपवाटिका अपहार, ग्रामसेवकाचे निलंबन

By admin | Updated: March 31, 2017 00:19 IST

अचलपूर पं.स.ची रविवारी झालेली वार्षिक आमसभा रोपवाटिका कागदोपत्री तयार करणाऱ्या तत्कालीन

पंचायत समिती आमसभा वादळी : सरपंचांची पाठ, अनेक मुद्यांवर खडाजंगीपरतवाडा : अचलपूर पं.स.ची रविवारी झालेली वार्षिक आमसभा रोपवाटिका कागदोपत्री तयार करणाऱ्या तत्कालीन ग्रामसेवकाच्या निलंबनाचा ठराव, अधिकाऱ्यांची दांडी, भ्रष्टाचाराचे आरोप, सभापतीच्या निवडणुकीत सदस्याचे बेपत्ता राहणे आदी विषयांवरून चांगलीच गाजली. रविवारी अचलपूर पंचायत समितीची वार्षिक आमसभा मेळघाटचे आ.प्रभुदास भिलावेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सभापती देवेंद्र पेटकर, उपसभापती सोनाली तट्टे, बीडीओ बाळासाहेब रायबोले, जि.प.सदस्य आशा वानरे, शिल्पा भलावी, पं.स.सदस्य कविता बोरेकर, सुनील तायडे, विणा ठाकरे, आइशष जावरकर, सुनीता दांडे आदींची उपस्थिती होेती. यावेळी गौलखेडा कुंभी येथे सन २०११ मध्ये रोहयो अंतर्गत २५ लक्ष रूपये खर्चुन रोपवाटिका तयार करण्यात आली. मात्र, रोपे तयार न करता लाखोंचा मलिदा तत्कालीन ग्रामसेवक गोहत्रे यांनी लाटल्याचे चौकशीत उघडकीस आले. अंजनगाव पं.स.मध्ये कार्यरत सचिवाच्या निलंबनाचा ठराव घेण्यात आला. कांडली, देवमाळी, गौरखेडा कुंभीसह इतर ग्रा.पं.मध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावंडे यांनी तक्रारींद्वारे करून संबंधितांवर कुठलीच कारवाई झाली नसल्याने सभेत एकच हंगामा झाला. शिक्षण विभाग शिक्षणात ढ असल्याचे आमसभेत स्पष्ट झाले. जि.प.अंतर्गत १२९ शाळा असून त्यांवर गट शिक्षणाधिकऱ्यांनी एकाही शाळेला वर्षभरात भेट दिली नाही. अनेक शाळा क आणि ड श्रेणीत असताना अचलपूर पं.स.ला आयएसओए प्रमाणपत्र दिले जाते. (तालुका प्रतिनिधी)