शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यगंगा नदीपात्राने घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: June 28, 2016 00:11 IST

तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथील सूर्यगंगा नदीपात्राचे आमदार यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले.

तिवसा : तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथील सूर्यगंगा नदीपात्राचे आमदार यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. त्यामुळे सूर्यगंगा नदीपात्राने मोकळा श्वास घेतला आहे. काही वर्षांपासून सूर्यगंगा नदीपात्रामध्ये केरकचरा व गाळ साचल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन या नदीची अवस्था बिकट झाली होती. तसेच पावसाळ्यात पुराचे पाणी नागरी वस्तीत व शेतात शिरल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. मात्र यापूर्वी या समस्येकडे गांभिर्याने लक्ष देण्यात आले नसल्यामुळे हा प्रश्न रखडला होता. याबाबत या परिसरातील नागरिक व शेतकरी यांनी ही वस्तुस्थिती आ. यशोमती ठाकूर यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी तत्काळ दखल घेऊन शासन दरबारी पाठपुरावा केला. त्याची फलश्रृती म्हणून शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू होऊन पूर्णत्वाकडे गेले. या कामाला नुकतीच प्रत्यक्ष भेट देऊन आ. यशोमती ठाकूर यांनी पाहणी करून आढावा घेतला.या कामासाठी गरज पडल्यास आणखी निधी मंजूर करण्याकरिता शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी सरपंच सागर बोडखे, दीपक सावरकर, किरण चौधरी, किशोर चौधरी, वामनराव भोजने, जितेंद्र ठाकूर, ग्रा. पं. सदस्य संजय चौधरी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता क्षीरसागर, नरेंद्र आसोडे, बाळू घुरडे, विनोद ओलवीकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)