शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्यातील कापड व्यावसायिकाच्या मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:13 IST

गणेश मंदिराच्या चॅनल गेटवर घेतला गळफास परतवाडा : स्थानिक कापड व्यावसायिक व संस्कृती शोरुमचे संचालक अशोक जिवतानी यांचा २७ ...

गणेश मंदिराच्या चॅनल गेटवर घेतला गळफास

परतवाडा : स्थानिक कापड व्यावसायिक व संस्कृती शोरुमचे संचालक अशोक जिवतानी यांचा २७ वर्षीय मुलगा ललित जिवतानी याने फॉरेस्ट डेपोमागील गणेश मंदिराच्या चॅनल गेटला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २० मार्च रोजी पहाटे ६ वाजतादरम्यान घडली.

१९ मार्चला मध्यरात्रीनंतर २ ते २.३० वाजता दरम्यान ललित वाहनाने घराबाहेर पडला. त्याच्या आईने भ्रमणध्वनीवरून त्याला विचारणा केली तेव्हा त्याने पहाटे ५ वाजेपर्यंत परत येत असल्याचे सांगितले. पण तो परतलाच नाही. त्याच्या आत्महत्येची वार्ताच जिवतानी परिवारात पोहचली. एक दीड वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला असून, त्याला सहा महिन्यांची मुलगी आहे. घटनास्थळाहून मृताच्या खिशातून एक चिठ्ठीही पोलिसांनी हस्तगत केली. मानसिक तणावात आत्महत्या करीत आहे. मम्मी-पापा माफ करा, असे त्या चिठ्ठीत नमूद केल्याचे पोलीससूत्रांनी सांगितले.

घटनेच्या अनुषंगाने परतवाडा पोलिसांनी मर्ग दाखल केला. गणपतीच्या साक्षीने गणपती मंदिराच्या चॅनल गेटलाच गळफास घेण्याची ही शहरातीलच नव्हे तर परिसरातील पहिलीच घटना आहे.

------