अमरावती : डॉक्टर पत्नीला अपशब्दा बोलल्यावरून वाद उफाळला. यात तिघांनी संगनमताने डोक्यावर लोखंडी पाइपने मारून जखमी केल्याची घटना वर्षा कॉलनीत मंगळवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदविला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}काशिनाथ वासनिक (५५),मयूर वासनिक (दोन्ही रा. यशोदानगर) व एका अनोळखी इसमाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. फिर्यादी अंकित गजानन कावळे (२७, रा. न्यू कॉलनी) यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविली. फिर्यादी व आरोपी एकामेकांच्या ओळखीचे असून फिर्यादी मित्राच्या वाढदिवसाकरिता मित्राच्या घरी गेला असता, आरोपीने वाद घालून मारहाण केली. आरोपीविरुद्ध कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.