शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वरुड, मोर्शी तालुक्यातील स्टोनक्रशर बेमुदत बंद

By admin | Updated: November 17, 2015 00:16 IST

महसूल विभागाने गौण खनिजाची रॉयल्टी वाढविल्याने गिट्टी खदानीवरील स्टोनक्रशर मालकांनी वरुड, मोर्शी तालुक्यातील स्टोनक्रशर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

रॉयल्टी वाढविल्याचा निषेध : बांधकामे रखडली वरुड : महसूल विभागाने गौण खनिजाची रॉयल्टी वाढविल्याने गिट्टी खदानीवरील स्टोनक्रशर मालकांनी वरुड, मोर्शी तालुक्यातील स्टोनक्रशर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबात उपविभागीय अधिकारी मोर्शी यांना मोर्शी तालुका खदान व क्रशर असोसिएशनच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे.या निर्णयामुळे दोन्ही ताुलक्यातील शासकीय तसेच खासगी बांधकामे रखडली आहेत. निवेदनानुसार, महाराष्ट्र शासनाने गौण खनिजावर ११ मे २०१५ पासून १०० टक्के वाढ करुन पूवीर् २०० प्रति ब्रास असलेली गिट्टी आता ४०० रुपये प्रति ब्रासप्रमाणे विकण्याचे आदेश निर्गमित केले. मात्र शेजारच्या मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशात ही रॉयल्टी अद्यापही १५० रुपये प्रतिब्रास आहे. महाराष्ट्रात पूर्वी २०० रुपये ब्रासप्रमाणे असलेली रॉयल्टी ४०० रुपये प्रतिब्रास केल्याने हा अन्याय करणारा निर्णय आहे. राज्य शासनाने १०० टक्के केलेली वाढ कमी करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, महसूलमंत्री, खनिकर्म मंत्री तसेच पालकमंत्री यांना निवदेन देऊन केली होती. परंतु यावर राज्य शासनाने कोणताही निर्णय न घेता रॉयल्टची १०० टक्के वाढ कायम ठेवली. यामुळे अखेर मोर्शी, वरुड तालुका खदान व क्रशर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सभा घेऊन या दरवाढीचा निषेध केला. यावेळी गिट्टीसह गौण खनिजाची १०० टक्के दरवाढ रद्द करावी. अन्यथा १५ नोव्हेंबरपासून बेमुदत स्टोन क्रेशर बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी मोर्शी यांना देण्यात आली. यावेळी क्रेशर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र भातकुले, उपाध्यक्ष विजय शिरभाते, सचिव जितेंद्र भोवते, उमेश मंत्री, गोपाल मालपे, दामजी पटेल, सौरभ खवले, रतन लंगोटे, नितीन खेरडे, सागर बेलसरे, प्रमोद टाकरखेडे, जितेंद्र अग्रवाल, विनोद जायस्वाल, गिरीष कराळे, अमित खेरडे, राजेश खेरडे, संजय बरडीया, एल.एल.मालानी, सैय्यद जफरुनी मोहिद अहमद यांचा समावेश होता. स्टोन क्रेशर बेमुदत बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे तालुक्यातील बांधकामावर विपरीत परिणाम होवून कोट्यवधींच्या बांधकामाला खीळ बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)