शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
7
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
8
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
9
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
10
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
11
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
12
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
13
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
14
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
15
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
16
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
17
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
18
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
19
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
20
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
Daily Top 2Weekly Top 5

अतिदुर्गम केलपानीत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम

By admin | Updated: December 11, 2014 22:58 IST

जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी मेळघाटातील शेवटचे टोक असलेल्या धारगड व्याघ्र प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाच्या प्रक्रियेत असलेल्या केलपानी या अतिदुर्गम गावात बुधवारी मुक्काम ठोकला.

धारणी :जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी मेळघाटातील शेवटचे टोक असलेल्या धारगड व्याघ्र प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाच्या प्रक्रियेत असलेल्या केलपानी या अतिदुर्गम गावात बुधवारी मुक्काम ठोकला. त्यामुळे या भागातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी बुधवारी पूर्णवेळ मुक्कामी आढळून आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळपासून संपूर्ण रात्र गावातील झोपडीत काढली. अमरावती, अकोला, बुलडाणा आणि मध्यप्रदेशच्या सीमेलगत अतिदुर्गम मेळघाटातील धारगड व्याघ्र प्रकल्पांतर्गत केलपानी हे जिल्ह्याचे शेवटचे गाव म्हणून ओळखले जाते. येथे चारशे कुटुंबाची लोकवस्ती असून १३०० लोकसंख्येचे हे गाव आहे आहे. येथील २५० कुटुंबांचे पुनर्वसन भिलमलकापूर (अकोट)येथे केले आहे. मात्र, त्यांना अद्यापपर्यंत मूलभूत सोई-सुविधा पुरविल्या जात नसल्याचे गावकऱ्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आयोजित सभेत सांगितले.
पुनर्वसनासाठी पूर्ण तयारी दर्शवून त्यांच्या काही मागण्यांचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यांच्या मागण्यांमध्ये उर्वरित १५० कुटुंबांना दहिखेड येथे पुनर्वसित करावे, तेथे शासनाने स्वत: खर्च करून योग्य त्या मूलभूत सोई, सुविधा जसे शाळा, वीज, पाणी, रस्ते, आरोग्य आदी सुुविधा उपलब्ध करून द्याव्यात, केलपानी येथे ५० वर्षांपासून रहिवासी असलेल्या कुटुंबांना विनाअट पात्र करावे, मेळघाटातील संभाव्य नोकरभरतीमध्ये या कुटुंबांना प्रकल्पग्रस्त म्हणून प्राधान्य द्यावे, प्रकल्पग्रस्तांना एकरकमी रक्कम दिली जावी, गावातील अनाथ मुले, विधवांना देखील पुनर्वसनाचा लाभ मिळावा, शेतीच्या बदल्यात शेती आणि घरांचे मूल्यांकन करून त्याचा मोबदला शासनाने पुनर्वसनाच्या रकमेतून न देता स्वतंत्रपणे द्यावा, वनहक्क कायद्यान्वये २००७ मध्ये ठरवून दिलेली कुुटुंबनिहाय १० लाखांची रक्कम वाढवून देण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी केलपानी गावातील सरपंच सीमा खांडवाये, सौदागर कांदे, नरहरी आंधळे, रमेश सोनोने, सुभाष बेठेकर, मौजीलाल जामुनकर, बिरजू मावस्कर, दिलीप कास्देकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी ठाणेदार नितीन गवारे, व्याघ्र अधिकारी नीळकंठ अलोणे, अनिल हागोणे, अळसपुरे, आनंद इंगळे यांचीही उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)