शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदी प्रक्रियेला प्रारंभ

By admin | Updated: March 13, 2017 00:01 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हायवेवरील ५०० मीटरच्या अंतरावरील सर्व प्रकारची मद्यविक्रीची दुकाने हद्दपार करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे.

‘हायवे’वरील मोजमाप पूर्ण : ३१ मार्चनंतर ‘त्या’ मद्यविक्री परवान्यांचे नूतनीकरण नाहीअमरावती : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हायवेवरील ५०० मीटरच्या अंतरावरील सर्व प्रकारची मद्यविक्रीची दुकाने हद्दपार करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अन्य यंत्रणांच्या माध्यमातून हायवेवरील अंतराचे मोजमाप पूर्ण केले असून त्याअनुषंगाने राज्य शासनाकडे अहवाल पाठविला आहे.हायवेवरील बियरबार, मद्यविक्रीची दुकाने हटविण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य तत्सम यंत्रणांच्या सहकार्याने महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील दारुविक्री व बियरबार, परमीट रूमचे अंतर निश्चित करुन त्यांची परवानगी घेतली जात आहे. यात बांधकाम विभागाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. ३१ मार्च २०१७ नंतर हायवेवरील दारुविक्री, बियर बार परवान्यांचे नूतनीकरण करु नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. अशी माहिती राज्य उत्पादनशुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानभवनात दिली. याबाबतची चिंता आता मद्यविक्रेत्यांना लागून राहिली आहे. तामिळनाडू राज्य विरुद्ध के.बालू व इतरांद्वारे दाखल सिव्हिल अपीलावर आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. ही कार्यवाही निश्चित करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत समिती गठित करण्यात आली होती. यासमितीची बैठक जानेवारी २०१७ मध्ये पार पडली. त्यानुसार महामार्गावरील ५०० मीटर अंतरावरील मद्यविक्री दुकानांचे मोजमाप करून संकलन करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘आहार’चे २० मार्चकडे लक्षआॅल इंडिया हॉटेल अ‍ॅन्ड रेस्टारेंट संघटनेच्यावतीने (आहार) सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या पाच बेंचपुढे सादर करण्यात आली आहे. याचिकेवर २० मार्च रोजी सुनावणी होणार असल्याने एकुणच मद्यविक्रेत्यांच्या नजरा २० मार्चकडे लागल्या आहेत.जिल्ह्यात ३९८ मद्यपरवान्यांचे नूतनीकरण नाहीसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील मद्यविक्री दुकानांवर कारवाई करायची झाल्यास जिल्ह्यात ४८२ पैकी ३९८ मद्यविक्री दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण होणार नाही, असे संकेत आहेत. त्यानुसार राज्य सरकारकडे उत्पादन शुल्क विभागाने अहवाल पाठविला आहे.