शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्यात मार्चपूर्वीच जलकुंभाच्या कामाला प्रारंभ

By admin | Updated: February 27, 2016 00:06 IST

बडनेरा आणि निम्म्या अमरावती शहरात उद्भवलेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मार्चपूर्वीच बडनेरा जुनीवस्तीत नव्या जलकुंभ निर्मितीचे काम सुरू केले जाईल,

रवी राणांचा निर्णय : शहरातील पाणीटंचाईवर मजीप्रात बैठकअमरावती : बडनेरा आणि निम्म्या अमरावती शहरात उद्भवलेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मार्चपूर्वीच बडनेरा जुनीवस्तीत नव्या जलकुंभ निर्मितीचे काम सुरू केले जाईल, असा निर्णय आ.रवी राणा यांनी शुक्रवारी घेतला. त्याअनुषंगाने जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना इस्टिमेट तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात पाणीटंचाईच्या कामांविषयी आ. रवी राणा यांच्या विशेष उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आ. राणा यांनी बडनेरा मतदारसंघात निर्माण झालेल्या पाणीटंचाईबाबत आढावा घेतला. यावेळी मजीप्राच्या अधीक्षक अभियंता स्वेता बॅनर्जी व कार्यकारी अभियंता पी. डी. भामरे यांनी निम्मे अमरावती व बडनेरा शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईविषयी वस्तुस्थिती विशद केली. बडनेरा शहरातील जुनीवस्ती येथे जीर्ण झालेले जलकुंभ जमीनदोस्त करण्यात आले आहे. हे जलकुंभ अमृत योजनेतून साकारण्यासाठी निधी मिळणार आहे. मात्र या प्रक्रियेला कालावधी असून निधी मिळताच बडनेऱ्यात जलकुंभ निर्माण केले जाईल, असे त्यांनी सांगितले. बडनेरा शहरात नवीवस्ती येथे असलेल्या एकाच जलकुंभातून पाणीपुरवठा केला जात असल्याचे मजीप्राचे कार्यकारी अभियंता भामरे यांनी माहिती दिली. त्यामुळे एकदा जलकुंभात पाणी साठा केल्यानंतर पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रसंग ओढावत आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार एकाच भागात पाणीपुरवठा करण्याचे दोन नियमावली असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा आ. राणा यांनी अधिकाऱ्यांना दिला. नागरिकांचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्यानंतर आ. राणा यांनी बडनेरा शहरात नवीन जलकुंभ साकारण्यासाठी मार्चपर्यत जलकुंभाचे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्यात. या आढावा बैठकीला रिपाइंचे गटनेता प्रकाश बनसोड, नगरसेवक अजय गोंडाने, राजेंद्र महल्ले, विजय नागपुरे, अंबादास जावरे, अधीक्षक अभियंता स्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता पी. डी. भामरे, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, तहसीलदार सुरेश बगळे, के. टी. उमाळकर, सुदर्शन जैन, मुन्ना रुणवाल, नीळकंठ कात्रे, सुदाम बोरकर, विलास वाडेकर, शैलेंद्र कस्तुरे, टेकचंद केसवानी, भाईजी जायवाल, जितू दुधाने, सुनील राणा, नितीन बोरेकर, अजय मोरय्या, उमेश ढोणे, किशोर गनवाणी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)