तिवस्यात शासकीय तूर खरेदीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:34 IST2021-02-05T05:34:23+5:302021-02-05T05:34:23+5:30

फोटो - यशोमती २५ एस अमरावती : तिवसा कृषिउत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोमवारी शासकीय तूर खरेदीचा पालकमंत्री यशोमती ठाकूर ...

Start buying government tires in Tivas | तिवस्यात शासकीय तूर खरेदीला प्रारंभ

तिवस्यात शासकीय तूर खरेदीला प्रारंभ

फोटो - यशोमती २५ एस

अमरावती : तिवसा कृषिउत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोमवारी शासकीय तूर खरेदीचा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

कोरोनाकाळात कृषिक्षेत्रापुढे अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करण्यासाठी महाविकास आघाडी शासनाने शेतकरी हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले व त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. गत १० वर्षांतील विक्रमी कापूस खरेदी यंदा झाली आहे. आता अधिकाधिक तूर खरेदी व्हावी, उत्पादक शेतकरी बांधवांचा या प्रक्रियेत समावेश व्हावा व कुणीही वंचित राहू नये, याची पुरेपूर प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले. शासकीय तूर खरेदीचा हमीभाव सहा हजार रुपये निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती तिवसा खरेदी विक्री केंद्राच्या व्यवस्थापकांनी दिली. याप्रसंगी अनेक मान्यवरांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Start buying government tires in Tivas