शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक विक्रेत्यांचा वाद चिघळणार

By admin | Updated: March 11, 2016 00:34 IST

मुद्रांक विक्रेता व दस्त लेखक यांची तहसील कार्यालय परिसरातील बैठक व्यवस्था मागील काही दिवसांपासून वादग्रस्त ठरली...

बैठक व्यवस्था वादात : संगणकामुळे व्यावसायिकांवर बेरोजगारीची वेळसुनील देशपांडे अचलपूर मुद्रांक विक्रेता व दस्त लेखक यांची तहसील कार्यालय परिसरातील बैठक व्यवस्था मागील काही दिवसांपासून वादग्रस्त ठरली असताना त्यांनी तेथे संगणक आणल्याने त्यांच्यात व झेरॉक्स, संगणकावर काम करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या व्यावसायिकांनी मुद्रांक विक्रेत्यांनी उभारलेल्या शेड, आणलेल्या संगणकावर हरकत घेतली आहे.रेल्वे गेट ते परतवाडा मार्गावर गेलेले दुय्यम निबंधक कार्यालय भाड्याच्या खोलीतून पुन्हा अचलपूर येथील तहसील कार्यालय परिसरात लोकाग्रहास्तव गेल्या ७ ते ८ महिन्यापूर्वी आणले गेले. सदर कार्यालय ज्या खोलीत झाले तेथे अगोदर मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांची बैठक व्यवस्था होती. हे कार्यालय येथे आल्याने मुद्रांक विक्रेत्यांना दुय्यम निबंधक कार्यालयामागे तहसील कार्यालयाच्या परिसरातच चार भिंती उभारुन टिनाचे शेड टाकून बैठक व्यवस्था करून देण्यात आली. ही व्यवस्था लोकवर्गणीतून केली असल्याची माहिती आहे. पण गेल्या ५-६ दिवसांपूर्वी येथे संगणक (कॉम्प्युटर्स) आणल्याने जवळच असलेले कॉम्प्युटर व झेरॉक्सची कामे करणाऱ्या व्यावसायिकांमध्ळे असंतोष निर्माण झाला. त्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन योग्य कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत अचलपूर येथील तहसीलसमोरील व्यावसायिकांनी तहसीलदारांना लेखी निवेदनात म्हटले की, लोकांची कामे त्वरित व्हावी व आम्हालाही रोजगार मिळावा म्हणून आम्ही लाखो रूपये भांडवल अडकवून झेरॉक्स व संगणकांवर होणाऱ्या कामांचा व्यवसाय सुरू केला आहे. परवानाधारक मुद्रांक विक्रेते व दस्तऐवज लेखक यांनी जमिनीवर अवैध बांधकाम करून शेड उभारले आहे. यामध्ये विद्युत मीटर घेऊन अवैधपणे संगणकावर कामे सुरू केली.