शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना मिळणार गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 13:37 IST

Amravati News अमरावती जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती मिळणार आहे. त्याकरिता आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देजलसंपदामंत्र्यांची ग्वाहीनिम्न पेढी, चंद्रभागा बॅरेज, वासनी प्रकल्पाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती मिळणार आहे. त्याकरिता आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. जलसंपदा विभागाच्या सिंचन भवनात गुरुवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जलसंपदा मंत्र्यांनी जलसंपदा विभागाचे सचिव संजय घाणेकर यांना व्हिडीओ कॉलवर जिल्ह्यातील प्रकल्पांना गती मिळण्यासाठी ज्या काही अडचणी असतील त्या तातडीने दूर करण्याच्या सूचनाही केल्या. यावेळी जलसंपदा मंत्र्यांनी निम्नपेढी, चंद्रभागा बॅरेज, वासनी, गर्गा, तसेच इतर लघु व मध्यम प्रकल्पांचा आढावा मुख्य अभियंता यांच्याकडून घेतला. भातकुली तालुक्यातील निम्नपेढी प्रकल्पांचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असून, न्यायालयाने या प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. चांगला वकील शासनाने नेमून न्यायालयाने दिलेले स्टे उठविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी आमदार सुलभा खोडके यांनी यावेळी मंत्र्यांकडे केली. त्यावर चांगला वकील नेमण्याची कारवाई सुरू असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. चंद्रभागा बॅरेजच्या पुनर्वसनासाठी पाठपुरवा करण्याच्या सूचनाही सचिवांना यावेळी त्यांनी दिल्या. वासनी, चंद्रभागा प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रश्नासाठी गती वाढवा. अशा सूचनाही यावेळी मंत्री यांनी सचिवांना केल्या. यावेळी आमदार सुलभा खोडके, दयार्पूरचे आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते हर्षवर्धन देशमुख, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार मोहिते, मुख्य अभियंता अनिल बहादुरे, मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) आशिष देवगडे, अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख, तसेच र्सव कार्यकारी अभियंता बैठकीला उपस्थित होते.

भुलेश्वरी नदीवर प्रकल्पाची मागणीभुलेश्वरी नदीवर नव्याने मध्यप्र प्रकल्प करण्यात यावे, अशी मागणी दयार्पूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली. मात्र मध्यम प्रकल्पाऐवजी लघु प्रकल्प होऊू शकतो. उपलब्ध पाण्यानुसार आखणी करावी, अशी सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कालाडोह प्रकल्पांच्या ठिकाणी पर्यटन विकास करा, वासनी प्रकल्पांची उंची वाढविण्याची मागणी यावेळी आमदार वानखडे यांनी केली.

कोहळ व सोनगाव शिवणगाव प्रकल्पाचा कालवा कार्यान्वित कराचांदूररेल्वे तालुक्यातील कोहळ व सोनगाव शिवणी लघु प्रकल्पाच्या कालवा कार्यान्वित करा, अशी मागणी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केली. सदर कालव्यांचे ट्रायल घेण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी दिल्या.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील