शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: August 18, 2014 23:15 IST

पुण्याच्या एसटी बसस्थानकातून माने नामक माथेफिरुने बस नेऊन पुण्यातील अनेकांना चिरडले होते. या घटनेचा धसका घेत राज्यातील सर्व बसस्थानकांत एक्झिट गेट लावून त्या बाजूलाच सुरक्षा रक्षकाचा

राजेश जवंजाळ - अमरावतीपुण्याच्या एसटी बसस्थानकातून माने नामक माथेफिरुने बस नेऊन पुण्यातील अनेकांना चिरडले होते. या घटनेचा धसका घेत राज्यातील सर्व बसस्थानकांत एक्झिट गेट लावून त्या बाजूलाच सुरक्षा रक्षकाचा कक्षही उभारण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार येथील मध्यवर्ती बसस्थानकातही एक्झिट गेट व सुरक्षा कक्षाची उभारणी करण्यात आली. परंतु सध्या हे गेट व कक्ष कचऱ्यात पडून आहे. याकडे एसटी महामंडळाचे दुर्लक्ष असून पुणे शहराप्रमाणे अमरावतीत एखादी अप्रिय घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. एसटी बसस्थानकातून कोणतीही बस नोंदणीशिवाय बाहेर जाता कामा नये, असा एसटीचा नियम आहे. त्यासाठीच पुणेच्या घटनेनंतर येथील मध्यवर्ती बसस्थानकात बाहेर निघण्याच्या मार्गावर रेल्वे गेटप्रमाणे एक खांब लावण्यात आला. त्याला बंद-सुरु करण्यासाठी कर्मचाऱ्यांकरिता लोखंडी पत्र्याचा कक्ष तयार करण्यात आला. यावर एसटी महामंडळाने खर्च केला. मात्र या दोघांचीही स्थिती दयनीय आहे. बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसची नोंद करण्यासाठी सुरक्षा रक्षक नियुक्त केला. परंतु नागपूर मार्गे जाणाऱ्या एसटींचीच नोंद केली जाते.