शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
3
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
4
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
5
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
6
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
7
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
8
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
9
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
10
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
11
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
12
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
13
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
14
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

२८ जूनला विशेष मतदार नोंदणी मोहीम

By admin | Updated: June 26, 2015 00:36 IST

मतदार याद्या शुद्धीकरण आणि प्रमाणिकरणाची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे.

अमरावती : मतदार याद्या शुद्धीकरण आणि प्रमाणिकरणाची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. २८ जून रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या मतदारांनी आपले नाव नोंदविले नाही किंवा वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांनी आपले नाव त्वरित यादीत नोंदवावे, असे आवाहन निवडणूक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३१ जुलै २०१५ पर्यंत राष्ट्रीय मतदार याद्या अद्यावतीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत निरंतर प्रक्रियेतील अर्ज सहा, सात, आठ आणि आठ अ स्वीकारले जाणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत मतदार छायाचित्र ओळखपत्राच्या डेटाबेसशी मतदारांचा आधार क्रमांक जोडण्यात येणार आहे. दुबार, मय्यत झालेले तसेच स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. छायाचित्रातील चुका दुरुस्त करुन प्रमाणित मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत. आधार क्रमांक मतदार छायाचित्र ओळखपत्र डेटाबेसमध्ये भरण्यासाठी विविध कार्यपद्धतींचा उपयोग करता येणार आहे. मतदारांनी मतदार याद्या अद्ययावत कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते व निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी गजेंद्र बावणे यांनी केले आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सुविधानिवडणूक आयोगाच्या ँ३३स्र//ीू्र.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर मतदार सेवा पोर्टलवर आधार क्रमांक व इतर माहिती भरता येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या ँ३३स्र//ूीङ्म.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल संकेतस्थळावर 'अपलोड युवर आधार' या लिंकवर माहिती भरता येईल. १६६/५१९६९ या क्रमांकावर ीू३’्रल्ल‘ स्पेस एपीक क्रमांक स्पेस आधार क्रमांक याप्रमाणे एसएमएस करता येईल. ई-मेल निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात येत असलेल्या मोबाईल 'अ‍ॅप'साठी १९५० या क्रमांकावर संपर्क करुन डेटाबेस भरता येईल किंवा प्रपत्र अ मध्ये माहिती भरुन ती आधार क्रमांक आणि मतदार छायाचित्र ओळखपत्राच्या छायाचित्रासह सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील मतदार केंद्रात जमा करता येणार आहे.