शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भेटीगाठी, विजयी रॅली काहींची मुंबईवारी !

By admin | Updated: October 20, 2014 23:03 IST

१३ व्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या जिल्ह्यातील आठपैकी चार आमदारांनी विजयानंतरचा पहिला दिवस मतदारांच्या भेटीगाठीत घालविला. भाजपचे चार आमदार बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत.

अमरावती : १३ व्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या जिल्ह्यातील आठपैकी चार आमदारांनी विजयानंतरचा पहिला दिवस मतदारांच्या भेटीगाठीत घालविला. भाजपचे चार आमदार बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत.रविवारी निकाल जाहीर होताच नवनिर्वाचित आमदारांनी मतदारांचे भरुभरुन आभार मानले. मतमोजणी स्थळापासून विजयी रॅली काढली. मात्र, सोमवार उजाडताच पुन्हा विजयी आमदारांनी मतदारांचे अभिवादन स्वीकारले. तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी सकाळपासूनच मतदारसंघात भेटीगाठी घेतल्या. मतदारांचे आभार मानत असताना भविष्यात जोमाने विकासकामे केली जातील, असे आश्वासन दिले.ग्रामीण भागातही यशोमतींनी भेट देऊन मतदारांचे आशीर्वाद घेतले. गावखेड्यात यशोमतींच्या स्वागतासाठी युवकांची लक्षणीय गर्दी होती. विजयी रॅलीत महिलांनी प्रचंड जल्लोष केला.बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी सोमवारी सकाळपासूनच घरी येणाऱ्यांचे अभिवादन स्वीकारले. दुपारी शहरी भागात काही ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या आणि मतदारांचे आभार मानले. नव्याने मतदारसंघातील विकासकामे पूर्णत्वास लावण्याचे अभिवचनही त्यांनी जनतेला दिले. स्लम वस्त्यांमध्ये जाऊन त्यांनी तेथील मतदारांचे आभार मानले. धामणगावरेल्वेचे आमदार वीरेंद्र गजताप यांनी नांदगाव खंडेश्वर येथे विजयी रॅली काढली. रॅलीनंतर सभा घेऊन मतदारांचे आभार मानले. दुपारी चांदूररेल्वे येथे घरीच जेवण घेतले. त्यानंतर मंगरुळ दस्तगिर येथील वीजेच्या धक्काने मरण पावलेल्या युवकाच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले त्यानंतर देवदर्शन घेतले. व सायंकाळी मुंबईला रवाना झाले. अचलपुरचे आ. बच्चू कडू सकाळपासून मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात मग्न होते. घरी येणाऱ्यांचे अभिवादन त्यांनी स्वीकारले. तसेच विकासकामांचा आढावाही घेतला. सायंकाळी मुंबईला रवाना होताना त्यांनी कार्यकर्त्यांना काही गावांना ेभेटी देण्याच्या सूचना दिल्या. आमदार सुनील देशमुख, अनिल बोंडे, रमेश बुंदेले, भिलावेकर पक्षाने बोलावलेल्या बैठकीसाठी मुंबईला गेले आहेत.