शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

‘जय गजानन’च्या घोषात अमरावतीकरांची सायकलने शेगाव वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST

२१ जणांचा सहभाग, आत्मनिर्भर भारतचा उदघोष, १५० किमी प्रवास अमरावती : शेगाव हे प्रत्येक भाविकाचे आवडते डेस्टिनेशन. कोरोनाकाळात बंद ...

२१ जणांचा सहभाग, आत्मनिर्भर भारतचा उदघोष, १५० किमी प्रवास

अमरावती : शेगाव हे प्रत्येक भाविकाचे आवडते डेस्टिनेशन. कोरोनाकाळात बंद असलेले हे मंदिर सायकलने गाठून, कोरोनाने चढलेला आळस झटकण्याचे आवाहन अमरावतीकरांनी केले. २१ जणांच्या या चमूत २५ ते ५० वर्षे वयोगटातील युवक होते. निवृत्त मेजर राजेंद्रसिंह बघेल व महाराष्ट्र ग्राम दर्पणचे रविराज देशमुख यांनी सायकलवारीचे नेतृत्व केले.

राजकमल चौकात २९ जानेवारी रोजी नगरसेवक चेतन पवार, भाजप शहराध्यक्ष किरण पातूरकर, उपमहापौर कुसुम साहू, गजानन देशमुख आदींच्या उपस्थितीत सायकल वारीला हिरवी झेंडी देण्यात आली. गाडगेनगराहून चांगापूर मार्गे सायकलवारीतील युवक निघाले. मार्गात वलगाव, चांगापूर, भातकुली, दर्यापूर येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. दहिहांडा येथे सोपीनाथ महाराज मंदिरात या चमूने मुक्काम केला. यानंतर निंबा फाटा येथील पेट्रोल पंपावर तसेच चोहोट्टा बाजार येथे स्वागत करण्यात आले. ३० जानेवारीला ४ ते ५ या वेळेत मिळालेल्या दर्शन पासनुसार शेगावला सायकलवारीने पोहोचलेल्या अमरावतीकर युवकांनी संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. दीडशे किलोमीटरचा हा प्रवास सुखद अनुभूती देणारा होता. परतीचा प्रवास सोबत नेलेल्या साहित्याच्या वाहनातून केल्याचे रविराज देशमुख यांनी सांगितले.

----------

पुढील वर्षी महिलांची सायकलवारीसायकलवारीत नऊ वर्षांची चिमुकली खुशी राजेंद्रसिंह बघेल ही वडिलांसोबत गेली होती. नोंदणी केलेल्या १०० सायकलस्वारांपैकी कोरोनामुळे सर्वप्रथम नोंदणी केलेल्या २१ जणांनिशी प्रवास करण्याचे निश्चित करण्यात आले. पुढील वर्षी महिलांना सोबत घेऊ. मात्र, प्रवासाचे अंतर जास्त असल्याने त्यांच्याकडून आधीपासून तयारी करून घ्यावी लागेल, असे देशमुख म्हणाले.

------------------

मंदिर व्यवस्थापनाकडून व्यवस्थेचा आदर्श

शेगाव संस्थान चोख व्यवस्थापनासाठी जाणले जाते. त्यानुसार अमरावतीकर सायकलस्वारांनी समाधी दर्शन आटोपले तोच त्यांच्याकरिता जेवण तयार होते. ऑटोमॅटिक वॉश बेसिन, सॅनिटायझर मशीन, साबणाचा वापर, सहा फुटांचे अंतर या बाबी मंदिर परिसरात प्राधान्याने पाळल्या जातात, असे देशमुख यांनी सांगितले.