शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे मूक आंदोलन, चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2022 05:00 IST

इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादीचे विभागीय समन्वयक संजय खोडके यांच्या नेतृत्वात मूक आंदोलन करण्यात आले तसेच पंचवटी चौकात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांच्या नेतृत्वात टायर जाळून चक्काजाम आंदोलन करण्यात आले.  महिला विंगच्यावतीने जिजाऊ पुतळा परिसरात मूक आंदोलन व काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक निवासस्थानी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी शहर राष्ट्रवादी काँग्रेसने मूक आंदोलन केले, तर ग्रामीण राष्ट्रवादीने टायर जाळले आणि चक्काजाम करून घटनेचा निषेध नोंदविला. इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादीचे विभागीय समन्वयक संजय खोडके यांच्या नेतृत्वात मूक आंदोलन करण्यात आले तसेच पंचवटी चौकात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांच्या नेतृत्वात टायर जाळून चक्काजाम आंदोलन करण्यात आले.  महिला विंगच्यावतीने जिजाऊ पुतळा परिसरात मूक आंदोलन व काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला. याप्रसंगी सुरेखा ठाकरे, सुषमा भैरवे, संगीता ठाकरे, कल्पना बुरंगे, मंगला भांबूरकर, मनाली तायडे उपस्थित होत्या.राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गेली ५० वर्षे एसटी कर्मचाऱ्यांचे हित जोपासत त्यांचे प्रश्न सोडविले. सद्यस्थितीतील राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला घेऊन सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांनी सरकारसोबत चार ते पाच वेळा चर्चा केली. मात्र, शांततेच्या मार्गाने आंदोलन  करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून त्यांना अवाजवी आश्वासने दाखवून  विध्वंसक वृत्तीच्या सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना चिघळविल्या. या कारस्थानामागे  काही मास्टर माईंड असून, त्यांना शोधून काढण्याचा निर्धार करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी मूक आंदोलनातून खबरदारीचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून एसटी कर्मचाऱ्यांच्या विध्वंसक आंदोलनाचा निषेध केला. याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, शहराध्यक्ष प्रशांत डवरे, जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, प्रदेश पदाधिकारी सुरेखा ठाकरे, डॉ. गणेश खारकर, प्रदीप राऊत, प्रा. प्रफुल राऊत, अरुण पाटील गावंडे, प्रकाशनाना बोंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नीलेश शर्मा, गुड्डू धर्माळे, सुशील गावंडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, शहराध्यक्ष सुचिता वणवे, माजी महापौर ॲड. किशोर शेळके, अविनाश मार्डीकर, वहीद  खान, अनिल ठाकरे, अजीज पटेल, ॲड. सुनील बोळे, अशोक हजारे, दिनेश देशमुख, गजानन बरडे, दीपक कोरपे, माजी नगरसेवक प्रवीण मेश्राम, विजय बाभूळकर, भूषण बन्सोड, श्रीकांत झंवर, नीलिमा काळे, संजय बोबडे, नितीन भेटाळू, संजय मळणकर, प्रमोद महल्ले, योगेश सवई, प्रशांत पेठे  आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :agitationआंदोलनSharad Pawarशरद पवार