संपापूर्वीच वाहन चालकांना फटका

By Admin | Updated: August 25, 2014 23:40 IST2014-08-25T23:40:16+5:302014-08-25T23:40:16+5:30

पेट्रोल व डिझेलवर सर्व राज्यांमध्ये समप्रमाणात कर आकारण्यात यावे, या मागणीसाठी राज्यभरातील पेट्रोल-डिझेल पंपधारक २६ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जात आहेत. या बंदमध्ये जिल्ह्यातील

Shot of drivers before the strike | संपापूर्वीच वाहन चालकांना फटका

संपापूर्वीच वाहन चालकांना फटका

रांगाच रांगा : जिल्ह्यातील १२५ पेट्रोलपंप आजपासून बंद
अमरावती : पेट्रोल व डिझेलवर सर्व राज्यांमध्ये समप्रमाणात कर आकारण्यात यावे, या मागणीसाठी राज्यभरातील पेट्रोल-डिझेल पंपधारक २६ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जात आहेत. या बंदमध्ये जिल्ह्यातील १२५ पेट्रोल पंप व्यावसायिक सहभागी होणार आहेत. संपाच्या वृत्तामुळे सोमवारी शहरातील सर्व पेट्रोलपंपांवर वाहनधारकांची तुंबळ गर्दी उसळली होती. काही पेट्रोलपंपमधील पेट्रोल संपल्याने ग्राहकांची प्रचंड तारांबळ उडाली.
महाराष्टालगतच्या छत्तीसगढ, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात व्हॅट, एलबीटी तसेच एसएससी कर अधिक प्रमाणात लादण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल, डिझेलवर प्रती लीटर ५ ते ६ रुपये अतिरिक्त भार पडतो आहे. हा भार कमी करावा, या मागणीसाठी पेट्रोलपंप व्यावसायिकांनी यापूर्वी ११ आॅगस्ट रोजी पेट्रोलपंप बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शासनाकडून आंदोलनाला प्रतिसाद न मिळाल्याने सोमवारच्या मध्यरात्रीपासून पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Shot of drivers before the strike