शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

भाजीबाजार येथील दारु विक्रीच्या दुकानाला टाळे

By admin | Updated: May 23, 2015 00:46 IST

नियम गुंडाळून येथील भाजीबाजारातील नागरी वस्तीत सुरु असलेल्या देशी दारुविक्रीच्या दुकानाला शुक्रवारी अखेर टाळे ..

महिलांचा एल्गार : राणांच्या नेतृत्वात आंदोलनअमरावती : नियम गुंडाळून येथील भाजीबाजारातील नागरी वस्तीत सुरु असलेल्या देशी दारुविक्रीच्या दुकानाला शुक्रवारी अखेर टाळे लावण्यात आले. आ. रवी राणा यांच्या नेतृत्त्वात दारुबंदी आंदोलनात परिसरातील शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी ढोल ताशांचा गजर, कायमस्वरुपी दारुबंदी झालीच पाहिजे, या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.वडाळी येथील देशी दारु विक्रीचे दुकान बंद होताच भाजीबाजारात दारुबंदीच्या मागणीने जोर धरला. या भागातील महिलांनी एम. जे. गुल्हाणे यांचा परवाना असलेल्या भाजीबाजारातील देशी दारुविक्रीचे दुकान या परिसरातून कायमस्वरुपी हद्दपार करण्याची मागणी केली. दारुबंदीसाठी पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, जिल्हाधिकारी किरण गित्ते, आ. रवी राणा, राज्य उत्पादक शुल्क विभागाला निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी गित्ते यांनी एक्साईजला या देशी दारुविक्री दुकानासंदर्भात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार २८ एप्रिल रोजी एक्साईजच्या अधिकाऱ्यांनी या दारुविक्री दुकानाबाबत असलेल्या तक्रारींची मोजणी वजा शहनिशा केली. या दारु विक्री दुकानापासून दवाखाना, लोकवस्ती, शाळा, भाजीबाजार अगदी हाकेच्या अंतरावर आहे. भाजीबाजार परिसरात असलेल्या दारु विक्रीच्या दुकानाविरुद्ध आ. रवी राणा यांच्या नेतृत्त्वात महिलांनी आंदोलन केले. परिस्थिती चिघळू नये, यासाठी तूर्तास या दुकानाला टाळे लावण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील कार्यवाही कशी करावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल.- शरद लांडगे,प्रभारी अधीक्षक, एक्साईज विभाग.