शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाला प्रतीक्षा एकाधिकार कापूस खरेदीची

By admin | Updated: November 4, 2014 22:33 IST

राज्य शासनाच्या कापूस एकाधिकार योजनेनुसार कापूस खरेदीला मुहूर्त गवसला नाही. मात्र ग्रामीण भागात काही ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांनी कापसाच्या खरेदीस सुरूवात केली आहे.

अमरावती : राज्य शासनाच्या कापूस एकाधिकार योजनेनुसार कापूस खरेदीला मुहूर्त गवसला नाही. मात्र ग्रामीण भागात काही ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांनी कापसाच्या खरेदीस सुरूवात केली आहे. यासाठी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३६०० ते ३८०० रूपये दिले जात आहेत. शासनाने लांब स्टेपलच्या कापसाला चार हजार रूपये हमी भाव जाहीर केला आहे. मात्र प्रत्यक्ष खरेदी कशी सुरू होणार याची बळीराजाला प्रतीक्षा आहे. शहरातील खासगी जिनिंगवर अद्यापही कापसाची आवक सुरू झालेली नाही. शहरात असलेल्या विविध जिनिंगवर मागील वर्षी ५ हजार कापसाच्या गाठीचे उत्पादन करण्यात आले होते. कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी राज्य शासनाकडून कापूस खरेदी योजना सुरू आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जाते. मात्र या खरेदीचा मुहूर्त अद्याप निघाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पैश्याची गरज असलेल्या शेतकऱ्यांकडून निघालेला कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकला जात आहे. कापसाची अद्याप वेचणी सुरूच आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापसाची पेरणी उशीरानेच सुरू केली त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पेरणी उशिरा झाली. कापसाचे पीक शेतकऱ्यांच्या घरात येऊ शकले नाही. तसेच मागील वर्षी दिवाळीही नोव्हेंबर महिन्यात आल्याने कापूस खरेदीचा शुभारंभ दिवाळीलाच करण्यात आला होता. परंतु यावर्षी दिवाळी आॅक्टोबरमध्ये आल्याने कापसाची खरेदी खासगी व्यापाऱ्यांकडून सुरू झाली आहे. तर काही भागात कापूस काढून झाला आहे. तरी कापसाचा भाव वाढण्याची अपेक्षा शेतकरी करत आहे. अमरावती जिल्ह्यात अद्याप तरी कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडीया अर्थात सीसीआयतर्फे कापूस खरेदी सुरू झाली नसल्याची माहिती आहे. यावर्षी कापसाला प्रति क्विंटल ४५०० रूपये हमी भाव देण्यात येणार आहे.शासनाचे कापूस खरेदीबाबतचे धोरण अद्यापही स्पष्ट झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी शासकीय विक्री केंद्रे उपलब्ध झाली नाहीत. परिणामी आर्थिक अडचण दूर करण्यासाठी नाईलाजाने कापूस व्यापाऱ्यांना विकून आपले आर्थिक व्यवहार शेतकऱ्यांना भागवावे लागत आहे. (प्रतिनिधी)