शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! खाद्यपदार्थ तळताना तेलाचा पुनर्वापर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:14 IST

अमरावती/ संदीप मानकर शहरात उघड्यावर खाद्यपदार्थ तयार केल्या जातात. मात्र खाद्यपदार्थ तळताना त्या तेलाचा एक किंवा दोनदा वापर होणे ...

अमरावती/ संदीप मानकर

शहरात उघड्यावर खाद्यपदार्थ तयार केल्या जातात. मात्र खाद्यपदार्थ तळताना त्या तेलाचा एक किंवा दोनदा वापर होणे अपेक्षित असताना वारंवार तेलाचा पुनर्वापर करून खाद्यपदार्थ तळून त्याची विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. असे पदार्थ सेवन करणे हे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.

कमी दर्जाच्या भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री करणे किंवा खाद्यपदार्थ तळताना खाद्यतेलाचा वारंवार पुर्नवापर करणे हे अन्न व सुरक्षा कायद्यानुसार नियमबाह्य आहे. अशा पदार्थांची विक्री होत असेल, तर अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, अन्न व प्रशासन विभाग वर्षाला बोटावर मोजण्याइतक्या कारवाया करीत असल्याने शहरातील किरकोळ व्यवसायिकांवर त्यांचा धाक उरला नसून लोकांची आरोग्य धोक्यात येत असल्याचे वास्तव आहे. शहरातील राजकमल चौक, जयस्तंभ चौक, गाडगेनगरसह शहरातील इतर मुख्य चौकातील रस्त्यावर शेकडो खाद्यपदार्थ विक्रेते खाद्यतेलाचा सर्रास पुनर्वापर करतात. तेलाचा रंग काळा पडेपर्यंत त्याचा वारंवार तेलाचा वापर केला जातो. त्यातून नागरिकांना घातक असे आजार उद्भवत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बॉक्स:

चटक-मटक पदार्थ आरोग्यासाठी ठरू शकतात घातक

चिभेचे चोचले पुर्ण करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उघड्यावर विक्री करणारे समोसे, कचोरी तसेच इतर पदार्थ आवडीने खातात. ते मोठ्या हॉटेलच्या तुलनेत स्वस्तसुद्धा मिळतात. मात्र, या ठिकाणी कमी दर्जाच्या तेलाचा वापर केला जातो तसेच तेलाचा आठ ते दहा वेळा पुनर्वापर केला जातो. तेलाच्या पुनर्वापर नियमानुसार करता येत नाही. परंतु, असे पदार्थ सेवन केल्याने पोटाचे विकार होतात. ॲसिडिटी तसेच हद्यासंबधित आजार, अल्जायमर होण्याची घशाची जळजळ आदी आजार होणे होतात.

बॉक्स:

तेलाच्या पुनर्वापराने होऊ शकतो कॅन्सर

तेलामध्ये एकदा कोणताही पदार्थ तळला आणि त्यानंतर त्याच उरलेल्या तेलात दुसरा पदार्थ बनविले गेले, तर अशा तेलात फ्री रॅडिकल्स तयार होतात. हे रॅडिकल्स आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारशक्तींवर परिणाम करतात. अनेकदा या रॅडिकल्समुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. एकदा वापरून झालेल्या तेलाचे पुन्हा-पुन्हा वापरल्याने ॲथोरोस्कलॉरोसिस होऊ शकतो, ज्यामुळे आपल्या शरीरातील कॅलेस्टोरेल वाढून धमन्या ब्लॉक होतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

कोट

तेलाचा वारंवार पुनर्वापर करणे हा गुन्हा ठरतो. एफडीएकडे नोंदणीकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तेलाचा पुनर्वापर करू नये, असे करताना आढळल्यास कारवाई केली जाईल.

- शरद कोलते, सह आयुक्त, अन्न प्रशासन, अमरावती

कोट

डॉक्टरचा कोट आहे.