चिखलदरा (अमरावती): तालुक्यातील अतिदुर्गम हतरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने एका गर्भवती महिलेला चक्क आरोग्य केंद्राच्या वऱ्हांड्यातच बाळाला जन्म द्यावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
तालुक्यातील खुटिदा येथील प्रेमती सतीश बेठेकर या महिलेला १३ जानेवारी रोजी प्रसूती कळा सुरू झाल्याने कुटुंबीयांनी तिला हतरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेव्हा आरोग्य केंद्रात डॉक्टर वा कर्मचारी कोणीच नव्हते. अखेर प्रेमती यांची आरोग्य केंद्राच्या वऱ्हांड्यातच प्रसूती झाली आणि एका गोंडस मुलीचा जन्म झाला.
प्रसूतीनंतरही बराच वेळ आरोग्य केंद्रात कोणीही फिरकले नाही. अखेर तिच्या कुटुंबाने बाळासह प्रेमतीला घरी नेले. या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राजकुमार पटेल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधले, तसेच दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
घटनेची माहिती मिळाली. यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी यांना तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.-डॉ. स्वप्नील मालखेडे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी, मेळघाट
Web Summary : In Amravati, a pregnant woman delivered her baby outside a primary health center in Hataru due to the absence of doctors and staff. The family took her home after delivery. Former MLA demanded action from authorities after the incident came to light. An inquiry has been ordered.
Web Summary : अमरावती में, डॉक्टरों और कर्मचारियों की अनुपस्थिति के कारण एक गर्भवती महिला ने हतरू में प्राथमिक स्वास्थ्य केंद्र के बाहर बच्चे को जन्म दिया। प्रसव के बाद परिवार उसे घर ले गया। पूर्व विधायक ने घटना सामने आने के बाद अधिकारियों से कार्रवाई की मांग की। जांच के आदेश दिए गए हैं।