शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

भातखाचऱ्यांमध्ये शिंगाडा पीक

By admin | Updated: May 21, 2015 00:39 IST

जिल्ह्यातील तलावांमध्ये अतिशय पौष्टिक मूल्य असलेले शिंगाडा पीक घेण्यात येते. मात्र या पारंपारिक पद्धतीला फाटा देत ....

भंडारा : जिल्ह्यातील तलावांमध्ये अतिशय पौष्टिक मूल्य असलेले शिंगाडा पीक घेण्यात येते. मात्र या पारंपारिक पद्धतीला फाटा देत पवनी तालुक्यातील १२ शेतकऱ्यांनी भात खाचऱ्यामध्ये शिंगाडा लागवड करून पडिक राहणाऱ्या भात खाचऱ्यातून उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला आहे.भंडारा हा तलावांचा जिल्हा आहे. येथे तलावांमध्ये मासे उत्पादनासोबतच येथील शेतकरी शिंगाड्याचे उत्पादनही घेतात. पवनी तालुक्यात ३४ हजार ६४२ हेक्टर एकूण पीक लागवडीखाील क्षेत्रापैकी ३८.२४ हेक्टर क्षेत्रावर शिंगाडा पीक घेण्यात येते. तालुक्यातील ढिवर-कहार जमातीचे सुमारे २५-३० शेतकरी शिंगाडा लागवड करतात. मात्र शास्त्रशुद्ध माहिती व आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभावी त्यांचे उत्पादन कमी होत असे.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मार्फत २०१३-१४ मध्ये पवनी येथे शिंगाडा शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेतकऱ्यांना शिंगाडा पिक लागवडीसंदर्भात शास्त्रशुद्ध तांत्रिक माहिती देण्यात आली. सोबतच भातखाचऱ्यामध्ये शेतकऱ्यांनी शिंगाडा पिक घ्यावे यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. कृषि विभागाने २०१४-१५ मध्ये पायाभूत सर्वेक्षण करून शिंगाडा लागवडीसाठी शेतकऱ्यांची निवड केली. यामध्ये कोटनापालार येथील पुंडलीक घ्यार, सुरज वाघमारे, सुदाम वाघधरे, भेंडाळा येथील रमेश मेंढे, विलास पारधी, रनाळा येथील हरिभाऊ घ्यार, रमेश दुधपचारे, हरीचंद्र दुधपचारे, संतोष दुधपचारे, शिरसाळा येथील श्रावण कांबळे, भोजापूर येथील रामाजी शेनमारे आणि पवनी येथील वंगणू शिवरकर या बारा शेतकऱ्यांच्या शेतावर शिंगाडा लागवड करण्यात आली. शेतकऱ्यांच्या शेतावर ६ शेतीशाळेच्या माध्यमातून त्यांना लागवड पद्धती, काढणी, तोडणी, तणाचे नियंत्रण, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग व किडीची ओळख, बाजार व्यवस्थापन इत्यादी माहिती देण्यात आली. धानाच्या लागवडीसाठी खाचरे करण्यात येतात. शेतातील उताराच्या भागातील खाचऱ्यांमध्ये जास्त पाणी जमा होते. त्यात धानाचे पिक बरोबर येत नसल्यामुळे तेवढा भाग पडीत राहतो. याच पडीत व उतारामधील भातखाचऱ्यांचा उपयोग शिंगाडा पिकासाठी करण्यात आला. यातून शेतकऱ्यांना ३५ क्विंटल एकरी उत्पादन मिळाले असून ४० हजार रूपये नफा मिळाला आहे. या बारा शेतकऱ्यांनी शिंगाड्याचे उत्पादन घेवून इतर शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखवला आहे. पुढील दोन वर्षात शिंगाडा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न कृषी विभाग व आत्मा मार्फत करण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)