शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
3
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
4
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
7
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
8
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
9
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
10
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
11
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
12
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
13
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
14
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
15
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
16
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
17
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
18
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
19
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
20
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
Daily Top 2Weekly Top 5

शकुंतला रेल्वे पुन्हा रुळावर धावणार ; रेल बचाव सत्याग्रह समितीने वर्षांपासून दिलेल्या लढ्याला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 12:54 IST

ब्रॉडगेजच्या डीपीआरला मध्य रेल्वेकडून मंजुरी : सत्याग्रह समितीच्या ३६ आंदोलनांना यश

लोकमत न्यूज नेटवर्क
अचलपूर (अमरावती):
शकुंतला रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यासाठी शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीने सात वर्षांपासून दिलेल्या लढ्याला यश आले आहे. ब्रॉडगेजच्या डीपीआरला मध्य रेल्वेकडून मंजुरी मिळाल्याचे त्यांना कळविण्यात आले आहे. सत्याग्रह समितीच्यावतीने आतापर्यंत ३६ आंदोलने करण्यात आली आहेत.

अचलपूरसह अचलपूर-मूर्तिजापूर नॅरोगेज मार्गातील गावांमधील नागरिकांच्या समन्वयातून आकारास आलेल्या शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीने सात वर्षांपासून विविध अहिंसक आंदोलन करून राज्य व केंद्र शासनाचे लक्ष वेधले होते. २०२२ ला एफएलएस तर मंजूर झाला; पण डीपीआरमुळे शकुंतला ब्रॉडगेजचे काम रखडले होते. बुधवारी सत्याग्रह समितीचे प्रतिनिधी योगेश खानजोडे, डॉ. राजा धर्माधिकारी, विजय गोंडचवर, दयाराम चन्देले यांनी भुसावळ मध्य रेल्वेचे महाप्रबंधक पुनीत अग्रवाल व मुख्य अभियंता (निर्माण) संदीप सिन्हा यांच्याशी त्यांच्या दालनात चर्चा केली असता त्यांनी शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज करण्याबाबत शासकीय स्तरावर झालेल्या प्रगतीबाबत खुलासेवार माहिती दिली. प्रथम चरणात अचलपूर-मूर्तिजापूरचा डीपीआर मार्गी लागल्याची माहिती त्यांनी सत्याग्रह समितीला दिली.

सत्याग्रह समितीचे गजानन कोल्हे, राजेश अग्रवाल, दीपा तायडे, शारदा उईके, कमल केजरीवाल, राजकुमार बरडिया, वसंत धोबे, संजय डोंगरे, सुरेश प्रजापती, प्यारेलाल प्रजापती, रामदास मसने, संतोष नरेडी, राजेंद्र जायसवाल, दीपाली विधळे, राजेश पांडे, किरण गवाई, मुरलीधर ठाकरे, शंकर बारखडे,किरण वडूरकर, बेबी वजाले, उज्ज्वला माकोडे, डॉ. दीपक गुल्हानेंसह शेकडो सत्याग्रहींनी अथक प्रयास केला. शकुंतला रेल बचाव समितीसोबत वेळोवेळी माहेर फाउंडेशन, आदिवासी पर्यावरण संघटन, संस्कार भारती, मानव सेवा समिती, क्रांतिज्योती संघटन, जमाते इस्लामी हिंद संघटन, मराठा सेवा संघ, व्यापारी संघटना यासह विविध समाज सामाजिक संघटनेचे योगदान राहिले. 

खासदारांचेही प्रयत्न फळाला

रेल्वे प्रशासनाने ७६.५६ किमी लांबीच्या मूर्तिजापूर-अचलपूर सेक्शनच्या नॅरोगेज लाईनचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी अंतिम स्थान सर्वेक्षण (एफएलएस) पूर्ण झाले आहे, जेणेकरून आता तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करता येईल. यानंतर तो प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाईल, अशा मजकुराचे पत्र खासदार बळवंत वानखडे यांच्याकडेही धडकले आहे. त्यांनी २२ मे २०२५ रोजी रेल्वे बोर्डाकडे तशी लिखित मागणी केली होती. याबाबत खासदारांनी आनंद व्यक्त केला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीrailwayरेल्वे