शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शबरी घरकूल योजना कागदावरच

By admin | Updated: October 30, 2015 00:24 IST

आदिवासींना हक्काचे घरकूल मिळावे म्हणून तत्कालीन सरकारने या त्यांच्यासाठी शबरी आदिवासी घरकूल योजना सुरू केली.

अडीच कोटी तिजोरीतच : आदिवासींची घरकुलासाठी भटकंतीमोहन राऊ त अमरावतीआदिवासींना हक्काचे घरकूल मिळावे म्हणून तत्कालीन सरकारने या त्यांच्यासाठी शबरी आदिवासी घरकूल योजना सुरू केली. मात्र, या योजनेचा जिल्ह्यात बोजवारा उडाला आहे़ जिल्ह्यात आदिवासींची कुटुंबसंख्या साडेतीन लाखांच्या आकड्यात असताना केवळ अडीच कोटी रूपये आले असूनही हा निधी अद्यापही शासनाच्या तिजोरीतच पडला आहे़ आदिवासी उपाययोजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या व्यक्तीसाठी गत राज्य सरकारने शबरी आदिवासी घरकूल योजना राबवायला सुरूवात केली होती़ मात्र या योजनेसाठी राज्य शासनाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे ही योजना केवळ काही काळ कागदोपत्री ठरली अखेर आदिवासी विकास हक्क संघटनेने मागील गत वर्षी जानेवारी महिन्यात सात दिवस थेट तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर उपोषण केल्यानंतर या योजनेकडे शासनाने नाममात्र निधी वळविला या निधीतून राज्यातील किती आदिवासींना घरकूल द्यावे, असा सवाल आता आदिवासी विभागालाच पडला आहे़नाशिक विभागाला सर्वाधिक निधी या योजनेंतर्गत देण्यात आला. परंतु या आयुक्तांकडून अमरावती विभागासाठी केवळ १७ कोटी रूपये या योजनेसाठी देण्यात आले त्यातील पहिल्या टप्प्यात अमरावती जिल्ह्याला ६७ लाख रूपये मिळाले तर दुसऱ्या टप्प्यात अडीच कोटींचा निधी प्राप्त झाला आहे़ एकीकडे आज जिल्ह्यात आदिवासी कुटुंबाची संख्या साडेतीन लाखांच्या घरात आहे़ विशेषत: धारणी क्षेत्रात ही आदिवासींची आकडेवारी मोठ्या प्रमाणात आहे़ आदिवासींच्या नावाने मते घेऊन आदिवासींचा विकास करण्याऐवजी योजनेच्या घोषणेचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला जातो़ मात्र आदिवासींना घरकुलांचा लाभ मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केला जात नसल्याची नाराजी आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे़अमरावती, अचलपूर, धामणगाव, चांदूररेल्वे, दर्यापूर, मोर्शी, वरूड, चांदूरबाजार, अमरावती शहर, शेंदूरजना घाट या शहरात आदिवासींची संख्या अधिक आहे़ यांना घरकूल देण्यासाठी नगरपरिषद व महानगरपालिका पुढाकार घेत असले तरी सन १९९५ च्या मतदार यादीत नाव तसेच त्या काळात येथे रहिवासी असणे अनिवार्य, अशी अट टाकण्यात आली आहे़ आजही अनेक आदिवासींचे दारिंद्र्यरेषेच्या यादीत नाव नाहीत. त्यामुळे ही दारिंद्र्यरेषेच्या कार्डाची अट शिथिल करावी, अशी मागणी आदिवासी संघटनेने केली आहे़